जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

हर घर तिरंगा कार्यक्रमाचे…या गावात आयोजन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतीनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत ‘हर घर तिरंगा व हर घर स्तनपान सप्ताह’ लक्ष्मणवाडी अंगणवाडी या ठिकाणी माहिला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी सरपंच सुलोचना दिलीपराव ढेपले या होत्या.

“डब्ल्यूबीडब्ल्यू वेबसाइटच्या २६ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार,जागतिक स्तनाचा आठवडा २०१० साठी ४८८ संस्था आणि ४०६,६२० सहभागी असलेल्या ७९ हून अधिक देशांमध्ये जगभरात ५४० कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.या दोन्ही अभियानाचा एक भाग बनण्याचा प्रयत्न संवत्सर ग्रामपंचायतीने केला आहे.त्याअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.भारताच्या ७५ व्या स्वातंत्र दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत.७५ व्या स्वातंत्र दिनानिमित्त देशात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवलं जात आहे.या शिवाय जागतिक स्तनाचा आठवडा हा वार्षिक उत्सव आहे जो दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान १२० पेक्षा जास्त देशांमध्ये आयोजित केला जातो.

सदर प्रसंगी श्रीमती उमा खोले पर्यवेक्षक यांनी गरोदर महिला व ३ ते ५ वयोगट मुलांच्या सकस आहारा विषयी माहिती आपल्याच परिसरातील पालेभाज्या शेवगा,अळू,कढीपत्ता,शेपु,पालक,मेथी तसेच शेंगादाने गुळ,निळ,राजगिरा खारीक यांचा आहारात जास्त वापर करावा पाणी जास्त वापरू नये स्वच्छता ठेवावी असे माहिती दिली तसेच दिलीपराव ढेपले यांनी जिल्हा परिषद अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेत मुले घालावीत सर्व काही मोफत असते इंग्रजी माध्यमाची मुलांना पैसे देवून शिक्षण घ्यावे लागते मराठीतून शिकून बरेच विदयार्थी मोठमोठ्या पदावर कामे करतात तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनास ७५ वर्ष होतात अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी दि १३ ते १५ हर घर तिरंगा ध्वज फडकवून स्वागत करावे या कार्यक्रमास श्री शिवाजीराव गायकवाड,दिलीपराव ढेपले अंगणवाडी सेविका माहिला व पालक उपस्थित होते श्रीमती तिरमखे यांनीआभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close