विशेष दिन
ग्राहक दिनास चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे २७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली असून या दिनास नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो.इ.स.१९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती.तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.तो नगर जिल्ह्यातही साजरा होत आहे.
राष्ट्रीय ग्राहक दिन दरवर्षी २४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.यानिमित्ताने २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृहात जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रत्येक माणूस हा प्रथम ग्राहक आहे.ग्राहक जागृती होण्याच्या दृष्टीने त्यांचे हक्क व कर्तव्य याची जाणीव व्हावी व तो सुजाण व्हावा. यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आलेला आहे. ग्राहक चळवळीशी सबंधित सर्व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित राहून ग्राहक चळवळ व शासन स्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे महत्व जाणून घ्यावे असे आवाहनही शेवटी जिल्हाधिकारी श्री.भोसले यांनी केले आहे.