कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव तालुक्यालाही त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल-जिल्हा प्रमुख

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या अनुभवाचा फायदा तालुका पोलीस ठाण्याच्या नागरिकांना नक्कीच होऊन त्यांच्या विकासाला अप्रत्यक्ष लाभ होईल असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांनी कोपरगाव शहरातील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी पोलीस निरीक्षक देसले यांना शुभेच्छा दिल्या असून अधिकारी दोन प्रकारचे असतात जे स्वतः पळतात आणि दुसरे दुसऱ्याला पळवतात असे सांगून आजची उपस्थिती ही त्यांच्या कामाची पावती असून त्यांचे कार्यक्षेत्र आता वाढले असल्याचे सांगितले आहे.
जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक,सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्यांचे आदेश नुकतेच जारी झाले आहेत.पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अध्यक्षतेखाली अस्थापना मंडळाच्या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत.संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले असल्याने त्याबाबत कारवाही सुरु झाली आहे.त्यात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव हे नुकतेच नाशिक ग्रामीणला रुजू होण्यासाठी रवाना झाले असून त्यांच्या जागी आता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे रुजु होत आहे.त्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे त्यांचे सहकारी त्यांना आज सायंकाळी भावपूर्ण निरोप दिला आहे.त्यासाठी शहर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे,कोपरगाव बेट येथील शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,सेनेचे शहर प्रमुख कलविंदर दडीयाल,सेनेचे माजी शहर प्रमुख अस्लम शेख,भरत मोरे,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,एस.सी.पवार,तुषार धाकराव,स्वच्छता दूत सुशांत घोडके,महिला आघाडीच्या विमल पुंडे,कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.कृष्णा फुलसुंदर,ऍड.नितीन पोळ,अनिल सोनवणे,आदी मान्यवरांसह शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक देसले म्हणाले की,”सत्काराच्या शाली या जबाबदारी वाढवत असतात त्यामुळे कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही ही धर्मपत्नीने केलेली तक्रार रास्त असली तरी स्वतःच्या कुटुंबापेक्षा समाजाचे कुटुंब महत्वाचे आहे.लष्करातील जवान देशाचे डोळ्यात तेल घालून सतत संरक्षण करत असतात त्या तुलनेने आमचे कर्तव्य कमी म्हटले पाहिजे.आपल्या कामाचे समाधान मानून घ्यावे लागत असते.त्यामुळे दुःख वाटून घेतले की आपोआप कमी होत असते कमी मनुष्यबळ असले तरी तक्रार करून चालत नाही.आमच्या पोलीस दलात प्रत्येक अधिकाऱ्यासमोर पद दर्शवत असताना पोलीस शब्द असतो त्यामुळे कर्तव्य करत असताना प्रत्येक जण पहिला पोलीस असल्याचे शेवटी सांगितले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी केले व तर सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी केले आहे तर आभार यांनी पोलीस निरीक्षक भरत दाते मानले आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”देसले साहेब यांना साहित्य आणि समाजातील माणसे वाचण्याचा छंद असून त्यांनी विद्यार्थी आणि समाजातील नागरिकांना सनदशीर मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले आहे.
सदर प्रसंगी प्रमोद लबडे,अनिल सोनवणे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,भरत मोरे,अस्लम शेख,पोलीस पाटील संघटनेचे प्रशांत आढाव,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,गोदावरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे,कलविंदर दडीयाल,शैलेश साबळे,ऍड.वैभव बागुल,डॉ.कृष्णा फुलसुंदर,मधुकर वक्ते,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,मनोहर कांबळे,एस.सी. पवार,
आदींनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे त्यांच्या कार्यकाळात आलेले अनुभव विषद केले आहे.
यावेळी ऍड.वैभव बागुल यांनी,”आरे भल्या माणसा पोलीस होऊन तरी बघ”ही कविता ऐकवली आहे.