जगावेगळा हरींनाम सप्ताह
जीवन जगण्यासाठी असत्याचा आधार नको-महंत रामगिरीजी महाराज

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
प्रवचन पुष्प क्रं.४जीवन जगण्यासाठी माणसाने असत्याचा आधार घेऊ नये.त्यामुळे पापाचरण घडू शकते व पुढील पिढ्यांना याची किंमत चुकवावी लागत असल्याचे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी श्री क्षेत्र कोकमठाण येथील प्रवचन सेवेचे तिसरे पुष्प गुंफताना केले आहे.
देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्री सद्गुरू गंगागीरीजी महाराज यांच्या,”शतकोत्तर अमृत महोत्सवी अखंड हरींनाम सप्ताह’ कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे आज नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला आहे.त्याचा प्रत्यक्ष लाभ तिसऱ्या दिवशीही लाखो भाविकानी घेतला आहे.त्यावेळी दुपारी एक वाजता महंत रामगिरीजी महाराज यांनी आपले प्रवचनाचे चौथे पुष्प गुंफले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी ह.भ.प.सेवागिरीजी महाराज सुंदरगिरीजी महाराज,दशरथ महाराज उकिरडे,शिर्डी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी वक्ते,संजीवनीचे माजी संचालक अरुण येवले,रमेश जवरे,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक धुमाळ,महाराज,मधुकर महाराज,केशवराव भवर,कोकमठाण ग्रामपंचायतीच्या सरपंच उषाताई दुशिंग आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”धार्मिक कार्यासाठी स्थान पवित्र असावे असे स्थान कोकमठाण आहे,या ठिकाणी विभांडक स्वामी,चक्रधर स्वामी,जनार्दन स्वामी महाराज,सदगुरु जंगली महाराज,आदींचे एकादशीचे नियोजन होत आहे.
पहिल्याच दिवशी दोन लाख भाविकांची उपस्थिती लाभली कालही अडीच तीन लाखांची उपस्थिती लाभली २१ टँकर आमटी,३१ ट्रॅक्टर भाकरी लागल्या आहेत.कोकमठां येथे या पूर्वी तीन सप्ताह होऊन गेले आता चौथा सप्ताह होत आहे.त्यांचा अनुभव या पूर्वीचा आहे.अध्यक्ष सुधाकर रोहोम,कार्याध्यक्ष रंगनाथ लोंढे,शरद थोरात यांच्या सह सप्ताह समिती तरुणाच्या कार्याचे कौतुक महंत रामगिरीजी महाराज यांनी केले आहे.ही सेवा भगवतभक्ती म्हणूण ते करत आहे.सप्ताहस्थळी पाऊस हमखास होतो.हा अनुभव आहे.
तेज,क्षमा,धृती,या तीन गुणांचा विचार तीन दिवसात केला आता शौच या गुणांचा विचार करू,बाह्य गुणापेक्षा आतील गुणांचा विकास,व दुर्गुणांचा त्याग म्हणजे शौच होय.घराला झाडूच लावला नाही तरघर घाण होईल तसेच आंतरिक स्वच्छता महत्वाची आहे.
दुर्गुणांना आमंत्रण द्यावे लागत नाही.सद्गुणांचा मात्र विकास करावा लागतो.सद्गुणांची वृद्धी करावी लागते.कपट,मोह,माया,वाईट विचार या पासून मुक्ती मिळवणे गरजेचे आहे.त्रिकाल संध्या का करतात याला हेच कारण आहे.तीन
संधी काळात जी पूजा करतो.ती मनाच्या शुद्धीसाठी करतात.मनातील शुद्धी ही सदविचाराने होत असते.स्नानादी शुद्धीतून बाह्य शुद्धी होते.ती गरजेची आहेच पण आंतरिक शुद्धी महत्वाची.हे करण्यासाठी अन्न गरजेचे आहे.अन्नाचा स्थूल भागाचा मल तयार होतो.तर मध्यम भागाचे शरीर पोषण होते.तर सूक्ष्म अन्नामुळे मनाचे पोषण होते.दुर्योधनाचे दूषित अन्न सेवन केल्याने यासाठी त्यांनी महाभारतातील दुर्योधनाचे व भीष्माचार्यांचे उदाहरण देत भीष्माचार्यांची बुद्धी दूषित का झाली होती.यासाठी त्यांनी दुर्योधनाच्या अन्नाला दोष दिला.यावेळी अल्युमिनियम मधील अन्न दूषित होते,तांब्याच्या भांड्यातील नव्वद टक्के चांगले तर दहा टक्के दूषित होते.मृत्तिकाच्या भांड्यातील अन्न सर्वात चांगले मानले जाते.अल्युमिनियम मधील अन्न हे कॅन्सरला निमंत्रण देते यासाठी त्यानी अमेरिकेतील प्रयोगशाळा व तज्ज्ञांचा दाखला दिला आहे.माणसाची वाचा सुद्धा शुद्धी असावी.तृष्णा हा माणसाला रोग आहे.जास्त आहार माणसाला त्रासदायक असतो.जास्त आहाराने आळस.आळस त्यातून येतो.व त्याने कार्य नासते. परमार्थ हा आळशी माणसाचा नाही.झाडाच्या मुळामुळे खडक दुभंगतो कशामुळे प्रयत्नामुळे.म्हणूंन माणसाने प्रयत्नवादी असावे.
त्यावेळी त्यांनी आळशी पती आणि कार्यशील पत्नी यांचे उदाहरण देऊन उपस्थित भाविकांना हसविले.तो पती कायम पत्नीला मी साधू होण्याची धमकी द्यायचा.वैराग्य पत्करणे व बाबा एवढे सोपे नाही.साधूने धडा दिल्यावर हा पुन्हा एकदा प्रापंचिक होऊन प्रापंचिक झाला असे उदाहरण देऊन उपस्थित भाविकांना हसविले.
कंसाने भयाने भक्ती केली.रामाशी रावणाने शत्रुत्व केले.तसे कोणती का होईना भक्ती करा.असे आवाहन केले.कुठलीही स्थिती निर्माण झाली तरी सत्य सोडू नये असे आवाहन केले आहे.जीवन जगण्यासाठी असत्य बोलू नये.
कौरव-पांडव युद्धात धर्मराज खोटे बोलले.द्रोणाचार्य पांडवांचे गुरू होते.तरी भगवंताने लीला रचली.अश्वस्थामा मेला अशी अफवा पसरवली.धर्मराजाने नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेतली आणि द्रोणाचार्य यांचा वध केला.हे असत्य बोलण्याची किंमत धर्मराजाला स्वर्गारोहणाचे वेळी चुकवावी लागली होती.वेळेवर संस्कार किती महत्वाचे आहे यासाठी त्यांनी एक गंभीर गुन्ह्यातील आरोपी कारागृहात असताना ब त्याला फाशीची शिक्षा झाली त्याचे उदाहरण दिले.व सर्व प्रथम आपण पेन चोरला त्यावेळीच आईने वेळीच शिक्षा केली असती तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती असा दावा केल्याचे उदाहरण देऊन समाजातील गंभीर वास्तवावर नेमकेपणाने बोट ठेवले आहे.रावण किती श्रीमंत होता तरी केवळ एका चुकीने त्याला खाली नरकात खेचले,जगज्जेता सिकंदराला हे जग सोडून जाताना हात सोडून जावे लागले याचे उदाहरण दिले आहे.स्वामी व व शिष्य यांच्या भोजनाचे निमंत्रण व शिष्याला वाटी चोरण्याची झालेली दुर्बुद्धी याचे उदाहरण दिले.
वाचिक,शारीरिक,बौद्धिक,मानसिक शुद्धी महत्वाची असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.या प्रवचन सेवेचे सूत्र संचलन पिंगळे मॅडम यांनी केले आहे.यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.या प्रवचन सेवेनंतर उपस्थित भाविकांनी भाकरी आमटी प्रसादाचा लाभ घेतला.