निधन वार्ता
शिवाजीराव भोसले यांचे निधन

न्युजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी शिवाजीराव गंगाधर भोसले यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले आहे.संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

स्व.शिवाजीराव भोसले यांनी नेते नामदेवराव परजणे यांचे विश्वासू सहकारी म्हणून सामाजिक,राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिले होते.संवत्सर येथील नामदेवरावजी परजणे पाटील विविध कार्यकारी विकास सेवा संस्थेवर सदस्य म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेले आहे.
कै.शिवाजीराव भोसले यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून लौकीक होता.स्व.दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी सामाजिक,राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिले.संवत्सर येथील नामदेवरावजी परजणे पाटील विविध कार्यकारी विकास सेवा संस्थेवर सदस्य म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेले आहे. मनमिळावू व धार्मिक स्वभावामुळे त्यांनी समाजात आदराचे स्थान मिळविले होते.
त्यांच्यामागे पत्नी,राहूल भोसले व ॲड.स्वप्नील भोसले ही मुले आहेत.संवत्सर येथे गोदावरी काठावर स्व.शिवाजीराव भोसले अंत्यसंस्कार करण्यात आलेत.यावेळी संवत्सर ग्रामपंचायतीचे उप सरपंच विवेक परजणे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेकांनी कै.भोसले पाटील यांना आदरांजली वाहिली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी भोसले कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.कै.शिवाजीराव भोसले यांच्या निधनामुळे संवत्सर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. |