जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कला व सांस्कृतिक विभाग

वहाडणे यांना ए.आय.फिल्म पुरस्कार प्राप्त !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (नानासाहेब जवरे)

  भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे सुपुत्र अजित वहाडणे यांच्या ‘अधुरे सपने’ या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए.आय.) सहाय्याने बनवलेल्या शॉर्ट फिल्मसाठी बेस्ट डायरेक्टर व बेस्ट सोशल फिल्म म्हणून १९ पारितोषिके मिळाली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांच्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन होत आहे.

अजित वहाडणे यांनी या कथेत एका मुला व मुलीच्या अयशस्वी प्रेमाची कथा चितारली आहे.त्यांच्या या फिल्मला जवळ जवळ १५० फिल्म फेस्टिवलमध्ये प्रवेश मिळाला आहे.

अजित वहाडणे यांनी या कथेत एका मुला व मुलीच्या अयशस्वी प्रेमाची कथा चितारली आहे.त्यांच्या या फिल्मला जवळ जवळ १५० फिल्म फेस्टिवलमध्ये प्रवेश मिळाला आहे.काहींनी तर कुठलेही प्रवेश शुल्क न घेता विशेष सन्मान म्हणून ही फिल्म समाविष्ट करुन घेतली आहे.या कथेला आजपर्यंत अनेक पारितोषिके जाहिर झाली आहे.पण सर्वच प्रत्यक्ष जाता येणे शक्य नसल्याने ते पुढील महिन्यात अमेरिका येथे जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

  कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए.आय.) शॉर्ट फिल्मचे भविष्य अत्यंत उज्ज्वल,क्रांतिकारी आणि वेगाने बदलणारे आहे.ए.आय.तंत्रज्ञानामुळे चित्रपट निर्मितीचा खर्च आणि वेळ मोठ्या प्रमाणात कमी होत असून,सामान्य व्यक्तीलाही जागतिक दर्जाच्या शॉर्ट फिल्म्स बनवण्याची संधी मिळत आहे.महागडे कॅमेरे,मोठे सेट्स किंवा व्हीएफएक्स टीमशिवाय केवळ एका लॅपटॉपवर संपूर्ण  शॉर्ट फिल्म तयार करणे शक्य होत आहे.यात नव्या कलाकारांना वाव मिळताना दिसून येत असून तांत्रिक ज्ञान किंवा मोठा आर्थिक पाठबळ नसलेले कल्पक लेखक आणि दिग्दर्शकही त्यांच्या कल्पना पडद्यावर आणू शकत असल्याचे उघड होत आहे.केवळ स्क्रिप्ट किंवा मजकूर टाईप करून हुबेहूब आणि उच्च दर्जाचे व्हिडिओ सीन्स तयार करता येत आहेत.खऱ्या अभिनेत्यांशिवाय हुबेहूब दिसणारे डिजिटल अ‍ॅक्टर्स वापरून आणि ए.आय.च्या मदतीने वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद आणि डबिंगचे अचूक लिप-सिंक करता येऊ लागले आहे.त्यातून अनेक इच्छुकाना आपली संधी शोधणे सोपे जात आहे.

आपल्या पुरस्कारासोबत अजित वहाडणे आणि यांचे कुटुंबीय दिसत आहेत.

   या संधीचे सोने करणारे व्यक्ती म्हणून कोपरगाव येथील निष्ठावान भाजपचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे ज्येष्ठ बंधू यांनी चोख भूमिका बजावली असल्याचे उघड झाले आहे.त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए.आय.) सहाय्याने बनवलेल्या ‘अधुरे सपने’ हा छोटा चित्रपट बनवला नाही तर त्याला विविध पुरस्कार मिळवून आपली त्यावर हुकूमत दाखवून दिली आहे हे विशेष ! त्यांच्या या छोट्या फिल्मसाठी लंडन-पॅरिस-मिलान,इटली-हॉलिऊड -भारत-यू.के.-टोकीयो,जपान आदी देशातील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ही सोळा पारितोषिके मिळाली आहेत.त्यात बेस्ट डायरेक्टर व बेस्ट सोशल फिल्म आदींचा समावेश आहे.या शॉर्ट फिल्मसाठी त्यांनी या कथानक आणि त्यासाठी गीते स्वतः लिहिले आहेत.

अजित वहाडणे या कथेला आजपर्यंत अनेक पारितोषिके जाहिर झाली आहे..

  अजित वहाडणे यांनी या कथेत एका मुला व मुलीच्या अयशस्वी प्रेमाची कथा चितारली आहे.त्यांच्या या फिल्मला जवळ जवळ १५० फिल्म फेस्टिवलमध्ये प्रवेश मिळाला आहे.काहींनी तर कुठलेही प्रवेश शुल्क न घेता विशेष सन्मान म्हणून ही फिल्म समाविष्ट करुन घेतली आहे.या कथेला आजपर्यंत अनेक पारितोषिके जाहिर झाली आहे.पण सर्वच प्रत्यक्ष जाता येणे शक्य नसल्याने ते पुढील महिन्यात अमेरिका येथे जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांना पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळत आहे हे विशेष ! त्यांनी त्यासाठी रात्रंदिवस संगणकासमोर बसून स्वप्रयत्नाने ही फिल्म बनविलेली आहे.त्यांच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close