ऊर्जा विभाग
कोपरगाव तालुक्यात विजेचा बोऱ्या,मंत्रालयात बैठक संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याला पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा बोऱ्या वाजला असून प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी मंत्रालयात बैठक घेतली असून आर.डी.एस.एस.च्या बैठकीमध्ये तालुक्यातील उर्जा विभागाच्या सर्व कामांचा समावेश करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती हाती आली आहे.
“कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडी,पोहेगाव,चासनळी सबस्टेशन सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही.सबस्टेशनला जोडण्याचे काम प्रलंबित आहे.त्यामुळे हे सबस्टेशन तातडीने जोडण्याच्या कामाला गती द्या”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडी,पोहेगाव,चासनळी सबस्टेशन सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही.उपकेंद्राला जोडण्याचे काम प्रलंबित आहे.त्यामुळे वरील परिसरात मोठ्या प्रमाणात वीज कमी दाबाने जात आहे.त्यामुळे विजेच्या उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.वीज पंप नादुरुस्त होत आहे.त्यामुळे शेतकरी या सुल्तानी संकटाला वैतागले आहे.आधीच पावसाने दडी मारली असल्याने खरीप पिके होत्याचे नव्हती झाली आहे.त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.थोडेफार विहिरीत पाणी आहे तर त्यासाठी पुरेशा दाबाने वीज प्राप्त नाही त्याकडे कोणास पाहण्यास वेळ नाही अशी विदारक स्थिती आहे.त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.पोहेगाव परिसरात तर शेतकरी विजेच्या कमी दाबास हैराण झाला आहे.त्यामुळे या प्रकरणी आ.काळें यांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
दरम्यान आज कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी या प्रकरणी लक्ष वेध केला असल्याची गोड बातमी आहे.त्यासाठी त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून कोपरगाव तालुक्यातील विविध प्रलंबित कामांचा आढावा घेवून कोपरगाव तालुक्यातील वीज ग्राहकांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा व्हावा याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
सदर प्रसंगी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रशांत खांडेकर,उपकार्यकरी अभियंता लक्ष्मण राठोड, सहाय्यक अभियंता किशोर घुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडी,पोहेगाव,चासनळी सबस्टेशन सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही.सबस्टेशनला जोडण्याचे काम प्रलंबित आहे.त्यामुळे हे सबस्टेशन तातडीने जोडण्याच्या कामाला गती द्या.कोपरगाव तालुक्याच्या विजेच्या बाबतीत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी वारी व रवंदे उपकेंद्राची शक्ती व रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी १ कोटी ४० लाख रुपये निधी दिला आहे.या निधीतून या सबस्टेशनच्या रोहीत्रांची क्षमता ३.१५ एम. व्ही.ए.वरून ५ एम.व्ही.ए.पर्यंत वाढणार असून वारी उपकेंद्राचे काम पूर्ण होवून ते कार्यान्वित झाले आहे.
मात्र ब्राम्हणगाव उपकेंद्राचे काम संथ गतीने सुरु असून या कामांची गती वाढवून लवकरात काम पूर्ण करा.मंजूर असलेल्या चांदेकसारे नवीन उपकेंद्राच्या निविदा प्रक्रिया लवकरात लवकर प्रसिद्ध करा.आर.डी.एस.एस.अंतर्गत मंजूर असलेले रवंदे उपकेंद्रासह सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना आ.काळे यांनी यावेळी दिल्या आहेत.याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.