गुन्हे विषयक
पाच लाखासांठी महिलेचा छळ,चार जणांविरुद्ध गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
फिर्यादी महिला हि सासरी नांदत असताना तिने आपल्या नवऱ्याला दुचाकी घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावे या साठी तिचा सासरी छळ करून तिला उपाशी पोटी ठेवून तिला मारहाण करून घराबाहेर काढून माहेरी धाडून दिले असल्याचा गुन्हा आरोपी नवरा करण धोंडीराम होंडे,सासू मंगल धोंडीराम होंडे,दिर संजीत धोंडीराम होंडे,नणंद अर्चना सुरेश पारखे आदी विरुद्ध फिर्यादी महिला पूजा करण होंडे (वय-२३) हिने गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोळपेवाडीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नवऱ्यास दुचाकी घेण्यासाठी व लग्नाच्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी आपल्या माहेरावरून आई वडिलांकडून ०५ लाख रुपये आणून न दिल्याने तसेच घरातिल काम येत नाही म्हणून वरील नवरा,सासू,दीर,नणंद आदीं आरोपीनीं तिंचा दि.०५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वारंवार शारीरिक मानसिक छळ केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”१९८६ मध्ये हुंड्यापासून संरक्षण देण्यासाठी कलम ४९८(अ) या कलमाची तरतूद करण्यात आली असून.हुंड्याच्या मागणीसाठी शारिरीक अथवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.मात्र या गुन्ह्यात कमी आल्याचे दिसत नाही.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे नुकतीच घडली आहे.
दरम्यान या प्रकरणी फिर्यादी महिला पूजा होंडे हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,” आपले लग्न कोळपेवाडी येथील तरुण करण होंडे यांचेशी दि.०१ डिसेंबर २०२१ रोजी मोठ्या वाजतगाजत झाले होते.सुरुवातीचा नव्यानवलाईचा दोन महिन्याचा काळ वगळता सासरच्या मंडळींनी आपल्याला त्रास देण्यास सुरुवात केली होती.त्यांनी आपण आपल्या नवऱ्यास दुचाकी घेण्यासाठी व लग्नाच्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी आपल्या माहेरावरून आई वडिलांकडून ०५ लाख रुपये आणून न दिल्याने तसेच घरातिल काम येत नाही म्हणून वरील नवरा,सासू,दीर,नणंद आदीं आरोपीनीं तिंचा दि.०५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वारंवार शारीरिक मानसिक छळ केला आहे.व तिला उपाशीपोटी ठेवून रात्री-अपरात्री घराबाहेर काढून तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून वाईट-साईट शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रं.अनुक्रमे ४१८/२०२३ भा.द.वि.कलम ४९८(अ),३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहे.पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वांढेकर हे करीत आहे.