आंदोलन
गौण खनिज ठरली डोकेदुखी,एक बचावाला,ग्रामस्थ संतापले !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोदावरीं नदीतील वाळू चोरांनी हैदोस घातलेला असताना आता वेस येथे वर्ग दोनच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिजा उपसा सुरू असून त्यामुळे रस्त्यांचा बट्ट्याबोळ होत आहे.त्यातच आज दुपारी वेस ग्रामपंचायत हद्दीत आज संदीप भाऊसाहेब म्हाळसकर हा तरुण आपली तीन चाकी चालवत असताना एका गौण खनिज चालकाने त्यांचे अंगावर गाडी घातल्याने त्याला खड्ड्यात जाण्याची नामुष्की ओढवली व तो बालंबाल बचावल्याने संतप्त ग्रामस्थानी आज तहसीलदार महेश सावंत यांना धारेवर धरत सदर गौण खनिज उपसा त्वरित बंद करण्याची मागणी केली असून तो बंद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान याआधीच अंजनापूर शिवारात गत सप्ताहात गुरुत्व गाढवे या शालेय बालकाचा अपघातात मृत्यू झाला असल्याचे वातावरण संतप्त आहे.त्यात आता वेस येतील वर्ग दोनच्या जमिनीतून अवैध रित्या गौण खनिजाचा उपसा सुरू आहे.यापूर्वी वेस येथील तलाठी यांना या डंपर चालकांनी मारहाण केली असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थानी केला आहे.त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात गंभीर गुन्ह्याचा आलेख सारखा वाढत आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत सातत्याने भर पडत आहे.मागील दिड वर्षापूर्वी शहरातील एक वकील,एक लेखापरीक्षक आणि एक डॉक्टर यांच्या एका रात्रीत तीन चारचाकी गाड्या (कार) चोरट्यांनी हातोहात लंपास केल्या होत्या.त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही.अन्य चोऱ्या,अवैध व्यवसाय,पुरवठा विभागातील राजरोस धान्य चोरी,वाळूचोर आणि त्यात सामील गुंड पोलिस आणि महसूल विभागास नाक खाजून दाखवत आहेत.गावठी कट्टे तर किराणा दुकानात सामान मिळावे असे सहज मिळत आहेत.या घटना पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये वाचावयास मिळत असत.पण त्याची पुनरावृत्ती आता महाराष्ट्रात आणि साखर पट्ट्यात आता सहज होत आहे.कोपरगाव शहर आणि तालुका त्याला अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळूचोरी आणि वाढलेला भ्रष्टाचार याने तालुका पोखरून निघाला आहे.माजी आ.अशोक काळे यांनी मंजूर करून आणलेला धारणगाव-कुंभारी पुलाजवळ कोणताही अदमास न पाहता त्याला वाळूचोरांनी सुरुंग लावला असल्याचे यापूर्वी उघड झाले होते त्यामुळे त्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता.अवैध वाळूमुळे मागील सप्ताहात आ.आशुतोष काळे यांनी प्रांताधिकारी व आणि तहसीलदार आदींना कोळपेवाडी कार्यालयात फैलावर घेतले होते.त्यानंतर काही परिवर्तन होईल अशी अपेक्षा फोल ठरली असल्याचे दिसून येत आहे.कारण आज तालुक्यातील वेस ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी मुरूम हा गौण खनीज घेऊन जाणाऱ्या डंपरने वेस येथील शेतकरी आणि ग्रामस्थ संदीप म्हाळसकर यालाच उडवले असून त्याने आपली तीनचाकी वाहन खड्ड्यात घातल्याने तो बालंबाल बचावाला आहे.त्यामुळे नजीकच्या ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला असल्याचे दिसून आले आहे.

याआधीच अंजनापूर शिवारात गत सप्ताहात गुरुत्व गाढवे या शालेय बालकाचा अपघातात मृत्यू झाला असल्याचे वातावरण संतप्त आहे.त्यात आता वेस येतील वर्ग दोनच्या जमिनीतून अवैध रित्या गौण खनिजाचा उपसा सुरू आहे.यापूर्वी वेस येथील तलाठी यांना या डंपर चालकांनी मारहाण केली असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थानी केला आहे.हा सर्व मुरुम शिर्डी,राहाता आदी ठिकाणी जात असल्याचे ग्रामस्थानी सांगितले आहे.दरम्यान या घटनेतील एका संतप्त सेवानिवृत सैनिकाने महसूली अधिकाऱ्यास दूरध्वनी करून फैलावर घेतले असल्याचे उघड झाले आहे.व आपण लागलीच शिष्टमंडळ घेऊन भेटण्यास येत असल्याची खबर दिली होती.त्यामुळे महसूली अधिकाऱ्यांनी आपल्या संरक्षणासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला असल्याचे उघड झाले आहे.

सदर शिष्ट मंडळाने तहसीलदार महेश सावंत यांना वेस ग्रामपंचायत हद्दीतील गौण खजिनाचे विना क्रमांकाचे अवजड वाहने तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे.सदर डंपर चालकांकडे गावठी कट्टे असून ते ग्रामस्थाना धमकावत असल्याची तक्रार केली आहे.या गौण खनिज वाहतूक दरांचा बंदोबस्त न केल्यास आपण आंदोलन करू व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील असा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.यावेळी तहसीलदार सावंत यांनी आपण कारवाई करू मात्र आपल्याला ग्रामस्थाचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले.यावरून मोठा जाबसाल झाला असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान या बाबत आपण तलाठी आणि मंडलाधिकारी यांना विश्वासात घेऊन कारवाई करू असे आश्वासन त्यांना दिले आहे.यात सुधारणा झाली नाही तर आपण पुढील सप्ताहात आंदोलन करू असा इशारा निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते अप्पासाहेब कोल्हे यांनी दिला आहे.

सदर प्रसंगी वेस सोसायटीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाडेकर,सेवा निवृत्त सैनिक ज्ञानेश्वर म्हाळसकर,राजेंद्र कोल्हे,सतीश म्हाळसकर,नामदेव म्हाळसकर,सुधाकर म्हाळसकर,भारत म्हाळसकर,सोमनाथ कोल्हे,गणपत कोल्हे,किरण कोल्हे,दत्तात्रय म्हाळसकर,दादासाहेब म्हाळसकर,बाळासाहेब म्हाळसकर,सुधाकर म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.



