जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

शेती नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या -…या खासदारांची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   परतीच्या पावसाने पूर्व भागासह कोपरगाव शहर आणि तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांना मोठा फटाका बसला आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांच्या या आपत्तीच्या वेळेत आपण त्यांचे बरोबर असून महसूल विभागाने शेती नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मतदारसंघातील कोकमठाण,करंजी,खडकीनाला परिसरात जाऊन पाहणी केली व नागरिकांना आधार दिला असून त्यांना भरपाई द्यावी अशी मागणी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे.

  

   कोपरगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची दैना उडाली असून सोयाबीन,मका,ऊस,कापूस,फळबागा आदी पिकांचेमोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकात अद्यापही मोठ्या प्रमाणावर पाणी असून अद्याप पाऊस थांबण्याची चिन्हे नाही त्यामुळे शेतकऱ्यांची त्यामुळे चिंता वाढली असून प्रशासनाने  नुकसान भरपाई देण्यासाठी आजच सकाळी बैठक घेतली असून या पार्श्वभूमीवर खा.वाकचौरे यांनी कोपरगाव येथील खडकी उपनगर आणि तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या आहेत.त्यावेळी ही माहिती दिली आहे.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव मतदारसंघात अनेक ठिकाणी घरात पाणी जाऊन नुकसान झाले आहे.तसेच संपूर्ण मतदारसंघात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आज मतदारसंघातील कोकमठाण,करंजी,खडकीनाला परिसरात जाऊन पाहणी केली व नागरिकांना आधार दिला आहे.

  दरम्यान कोपरगाव मतदारसंघात सगळीकडेच ब्राम्हणगाव चौफुला,धारणगाव,टाकळी,म्हसोबा वाडी या भागांत देखील अतिवृष्टी झाली असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे सरसकट सर्वच पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहे.

   सदर प्रसंगी जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर,कालवा कृती समितीचे उत्तमराव घोरपडे,माजी अध्यक्ष गंगाधर गमे,बाळासाहेब चव्हाण,कोपरगाव तालुका शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गंगाधर रहाणे,संजय दंडवते,कृष्णा अहिरे आदी मान्यवर आणि त्यांचे सहकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close