जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…या दिवशी कोपरगाव शहर बंदची हाक ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

बदलापुरातील शाळेत साडे तीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली.या घटनेनंतर बदलापुरात संतापाची लाट उसळली. पालकांनी तीव्र आंदोलन केलं. या प्रकरणाची तक्रार दाखल केल्यानंतरही गुन्हा दाखल करुन घेण्यास पोलिसांनी तब्बल १० ते १२ तास लावले याचा मोठा संताप राज्यात व्यक्त होत आहे.या शिवाय बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ आणि देशातील हिंदू विरोधी कारवाया,भारत देशाविरोधी विद्रोह पेटवण्याचे काम करणार्‍यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार दि.२४ ऑगस्ट रोजी कोपरगाव बंदची हाक देण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

“महायुतीचे सरकार आल्यापासून त्यांना विरोधी पक्षाना फोडण्यात व्यस्त आहे मात्र राज्यातील अल्पवयीन मुलीवर होणारे अत्याचार होताना दिसत नाही.यातील गुन्हे दडपण्याचे निंदनीय काम होताना दिसत आहे.मात्र त्याकडे या सरकारकडे पाहायला वेळ नाही ही मोठी निषेधार्थ घटना आहे.आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी”- संदीप वर्पे,प्रवक्ते,राष्ट्रवादी शरद पवार गट.

     सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे,काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे,शिवसेना उबाठा गटाचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे,प्रमोद लबडे,उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव,शहाराध्यक्ष सनी वाघ,माजी अध्यक्ष कलविंदर दडियाल,भरत मोरे,माजी तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी सभापती कालू अप्पा आव्हाड,माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे,राखी विसपुते आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

सदर प्रसंगी राजेंद्र झावरे,संदीप वर्पे,प्रमोद लबडे,कैलास जाधव,राखी विसपुते,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

देशभर महाविकास आघाडीच्या वतीने नुकतेच देशव्यापी बंद आयोजित केला होता.त्याला राज्यात संमिश्र तर कोपरगाव येथे त्याचा फज्जा उडाला असताना या कोपरगाव बंदला आगामी शनिवार दि .२४ ऑगस्ट रोजी कसा प्रतिसाद मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

  सदर पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक कैलास जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवाजी ठाकरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close