शैक्षणिक
…या महाविद्यालयात कार्यशाळा उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैया महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने राष्ट्रिय शैक्षणिक धोरण : २०२० विषयावर कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती प्र. प्राचार्य प्रो.बी.बी. भोसले यांनी आमच्या प्रतिनिधींस दिली आहे.

“विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा राजा असुन नविन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर अवलंबुन असुन यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासात वाढ होणार आहे”-डॉ.रमेश भिसे,भौतिकशास्त्र विभागप्रमुख, आळेफाटा महाविद्यालय.
या कार्यशाळेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य व आळेफाटा महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभागप्रमूख डॉ.रमेश भिसे हे मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते.
यावेळी डॉ.रमेश भिसे यांनी राष्ट्रिय शैक्षणिक धोरण यावर भाष्य करतांना विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा राजा असुन नविन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर अवलंबुन असुन यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासात वाढ होणार असल्याचेही नमूद केले.यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची पार्श्वभुमी व अंमलबजावणी अधोरेखित करतांना या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचेही सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये व त्यातील आव्हाने यावर विस्तृत भाष्य करतांना उपस्थित प्राध्यापकांच्या विविध शंकाचे समाधान केले.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो.बी.बी.भोसले यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले की नविन शैक्षणिक धोरण हे शिक्षण क्षेत्राला नवीन दिशा देणारे असुन या धोरणामुळे महाविद्यालयीन गुणवत्तेची जबाबदारी वाढलेली असुन विद्यार्थीकेंद्रित विविध कौशल्य विकसित करण्यासाठी प्राध्यापकांनी पारंगत असणे गरजेचे असल्याचे सांगितले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो.व्ही.सी.ठाणगे यांनी प्रास्ताविकात या कार्यशाळेचा मुख्य उद्देश्य नमूद केला आहे.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार संयोजक प्रो.एस.एल.अरगडे यांनी केले.यावेळी वरिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.