कोपरगाव तालुका
कोपरगावात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा -ॲड. रश्मी कडू कोपरगाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा मुक्त संचार पाहण्यास मिळत आहे. त्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी प्रेरणा फाउंडेशन चे उपाध्यक्षा ॲड. रश्मी मनोज कडू यांनी एका निवेदाद्वारे कोपरगाव नगरपालिकाचे अधिकारी श्वेता शिंदे यांचेकडे नुकतीच केली आहे.
कोपरगाव शहरात भटकी कुत्री व जनावरे मोठ्यांप्रमानावर वाढली आहे.या जनावरांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात रहदारीला अडथळा निर्माण होत असून अपघात वाढले आहे.सदर भटक्या जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने त्वरित करणे गरजेचे आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या देखील मोठी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात लहान मुलांना देखिल जखमी केले होते .भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असल्यामुळे वाहन चालवितांना अपघात होण्याचा धोका वाढला आहे.तसेच भटके कुत्रे,डुकरे,आदी जनावरांनमुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा व इतर अपघाताचे धोके संभावतात , त्यामुळे सदर भटक्या जनावरांचा त्वरित बंदोबस्त करणे आवश्यक आहे. सदर भटक्या जनावरांचा त्वरित बंदोबस्त न केल्यास नगरपालिका कार्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रेरणा फाउंडेशनचे उपाध्यक्षा ॲड.रश्मी मनोज कडु यांनी शेवटी दिला आहे.