कोपरगाव तालुका
भक्तांच्या उपस्थितित वाकडीत मूर्ति वर्धापन सोहळा संपन्न

जनशक्ती न्यूजसेवा
वाकडी-(प्रतिनिधीं)
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत नगर जिल्ह्याची प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकड़ी येथील खंडोबा महाराज मूर्ति स्थापना वर्धापन दिन सोहळा भाउबिज दिवशी साजरा करण्यात आला आहे.कोरोना सारख्या साथीमुळे गेली सहा महिने पासून सर्वच मंदिरे बंद होती.त्यामुळे वाकडी येथील यावर्षीचा खंडोबा मंदिर मधील मूर्ती स्थापना वर्धापण (भाऊबीज उत्सव) रद्द करण्यात आला होता.
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत नगर जिल्ह्याची प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकड़ी येथील खंडोबा महाराज मूर्ति स्थापना वर्धापन दिन सोहळा भाउबिज दिवशी साजरा करण्यात आला आहे.कोरोना सारख्या साथीमुळे गेली सहा महिने पासून सर्वच मंदिरे बंद होती.त्यामुळे वाकडी येथील यावर्षीचा खंडोबा मंदिर मधील मूर्ती स्थापना वर्धापण (भाऊबीज उत्सव) रद्द करण्यात आला होता. मात्र दिवाळी च्या तिसऱ्या दिवशी भाऊबीजला मंदिर खुली करण्याचा सरकारी आदेश आल्याने व योगायोग त्याच दिवशी खंडोबा मूर्ती स्थापना वर्धापण सोहळा असल्यामुळे अचानक हा उत्सव सायंकाळी न साजरा करता सकाळी साजरा करण्यात आला तरी देखील या उत्सव सोहळ्यामधे सुमारे शेकडो भाविकांनी सामूहिक जागरण घट भरविले होते व यावेळी पंचक्रोशितील वाघे मंडळी सुद्धा हजर होऊन देवाचे जागरण करून भंडारा उधळण करून जागर केला. वाकड़ी येथील खंडोबा महाराज मंदिर मधे सन् १९९१ साली येथील कै.ह.भ.प.रामनाथ बाबा कोते यांच्या हस्ते भाऊबिज दिवशी मूर्ति स्थापना करण्यात आली होती तेव्हा पासून मंदिरात दरवर्षी रामनाथ बाबा कोते यांच्या संकल्पनेतुंन वर्धापन सोहळा साजरा होत आहे.आता हा उत्सव त्यांचे चिरंजीव दत्तात्रय रामनाथ कोते यांच्या मार्गदर्शनखाली व भाऊबीज मित्र मंडळ यांच्या सहकार्यतुन सुरु राहणार आहे