जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अर्थकारण

पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित रहाणे हिकाळाची गरज-सहकार मंत्री

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सहकारी पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित रहाणे हिकाळाची गरज असून याबाबत सहकार विभागातील मान्यवरांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन विश्वासपात्र व दुरुस्त प्रस्ताव आणला जाईल असे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी नुकत्याच एका बैठकीत बोलताना केले आहे.

“राज्यात सुमारे सोळा हजारांहून अधिक पतसंस्था असून,त्यामध्ये कष्टकरी वर्गापासून मध्यमवर्गीयां पर्यंतच्या ठेवीदारांच्या ठेवी आहेत.या सर्वसामान्य ठेवीदारांना सावकारी पाशातून मुक्त करून आर्थिक बळ देण्याचे महत्त्वाचे काम पतसंस्थांनी केले आहे.मात्र,दुर्दैवाने एखादी पतसंस्था बुडाल्यास त्यांच्या ठेवींना विम्याचे कोणतेही संरक्षण ते अडचणीत येतात त्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते”-अड्.रवींद्र बोरावके,सहकार भारती,पदाधिकारी,कोपरगाव.

राज्यातील सहकारी पतसंस्थांवर मधील जनतेच्या ठेवींना संरक्षण मिळावे व पतसंस्थाही सुस्थितीत रहाव्यात.यासाठी सहकार विभागाने एक योजना तयार केली असून त्यावर विचार विनिमय करण्यासाठी सहकार मंत्रालयाने सहकार मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थित एक संयुक्त बैठक मुंबईत नुकतीच आयोजित केली होती.त्यात या विषयावर वैचारिक मंथन संपन्न झाले असल्याची माहिती भारत संचार निगमचे केंद्रीय संचालक अड्.रवींद्र बोरावके यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

राज्यभरात सुमारे सोळा हजारांहून अधिक पतसंस्था असून,त्यामध्ये कष्टकरी वर्गापासून मध्यमवर्गीयां पर्यंतच्या ठेवीदारांच्या ठेवी आहेत.या सर्वसामान्य ठेवीदारांना सावकारी पाशातून मुक्त करून आर्थिक बळ देण्याचे महत्त्वाचे काम पतसंस्थांनी केले आहे.मात्र,दुर्दैवाने एखादी पतसंस्था बुडाल्यास,त्यातील ठेवीदार अडचणीत येतात.कारण त्यांच्या ठेवींना विम्याचे कोणतेही संरक्षण नाही.त्या पार्श्वभूमीवर सहकार विभागांतर्गत पतसंस्था नियामक मंडळाने पन्नास हजारांपर्यंतच्या ठेवींना विम्याचे कवच देण्यासाठी प्रस्ताव तयार केला असून,त्यावर सहकारमंत्री आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे सहकार विभागातर्फे जाहीर करण्यात आले होते.त्यानुसार या बैठकीचे नुकतेच आयोजन केले होते.

सदर प्रसंगी आ.अंबिटकर,सहकार विभागाचे सचिव अनुपकुमार,आयुक्त अनिल कवडे आदी प्रमुख अधिकारी व सहकार भारतीच्या वतीने ॲड.रविंद्र बोरावके,विजय देशमुख फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,ॲड.दिपक पटवर्धन,डाॅ.शिंगी तसेच मुंबईतून जिजाबा पवार,वसंतराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी सहकार खात्याचे आयुक्त कवडे यांनी प्रास्तविक केले आहे.दिली.सदर प्रसंगी ॲड.बोरावके म्हणाले की,”पतसंस्थातील ठेवींना व संस्थांना संरक्षण देतांना संस्थांच्या अंशदाना बरोबरच शासनाचाही सहभाग असावा,तरच सर्वांचा सहभाग मिळेल.नियोजन मंडळामध्ये पतसंस्थांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे.विभागवार नियोजन उपसमित्या असाव्यात.हि योजना राबविण्यासाठी केरळच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा असावी.गुंतवणुकीबाबत धोरण ठरवावे.पतसंस्था अधिक सक्षम होण्यासाठी उत्पन्न वाढविण्याचे स्रोत निर्माण करावेत असे आवाहन अड्.बोरावके यांनी केले आहे.सदर प्रसंगी सहकार आयुक्त कवडे यांनी सदर विषय लवकरच हा विषय मार्गी लावू असे आश्वासन उपस्थितांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close