जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

बहिणीच्या हत्ये नंतर…तिने केला तरुणाशी विवाह,कोपरगाव तालुक्यातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या नगर-मनमाड महामार्गालगत भन्साळी ट्रॅक्टर जवळ रहिवासी असललेली अल्पवयीन मुलगी हर्षदा बानकर (वय-१७) हिची हत्या करून तिची आरोपी बहिण सृष्टी बानकर हिने आपला खंडाळा ता.श्रीरामपूर येथील प्रियकर याचे सोबत न्यायालयीन विवाह केला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

दरम्यान याबाबत पोलिसांनी तिचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन केले होते.त्याचा अहवाल काल दि.५ ऑक्टोबर रोजी प्राप्त झाला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘तो’ मृत्यू “गळा दाबून झाल्याचा” अहवाल दिला असल्याने पोलिसांनी आरोपी बहिण सृष्टी बानकर हिच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद हि रद्द करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत मुलगी स्व.हर्षदा नवनाथ बानकर (वय-१६) हिचे वडील हे समृद्धी महामार्गावर वाहनावर चालक असून घरात आई,एक मोठी बहीण,एक लहान भाऊ असा परिवार असून आहे.ती नगर-मनमाड रस्त्यालगत कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असून त्याच रस्त्यावर त्यांचे साधे चहाचे हॉटेल होते.मयत मुलगी हि सोमैय्या महाविद्यालयात अकरावी शास्त्र विषयात शिक्षण घेत होती.मात्र तिने अज्ञात कारणाने दि.३० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० नंतर आपल्या राहत्या घरात पलंगाला दोरी अडकून गळफास (हास्यास्पद दावा) घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याचा दावा कुटूंबियांनी व पोलिसांनी केला होता.व सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता.याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रं.६०/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली होती.दरम्यान याबाबत पलंगाला दोरी बांधून आत्महत्या हा मोठा विनोद ठरत होता.याबाबत आमच्या प्रतिनिधीने संशय व्यक्त केला होता.

दरम्यान या प्रकरणात मयत मुलीची थोरली बहीण या घटनेनंतर बेपत्ता झाली होती.हा निश्चितच योगायोग नव्हता.प्रसिद्ध झालेल्या बातम्या नंतर मात्र ती आपल्या प्रियकरासंवेत पळून गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या (वैजापूर नव्हे) श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून मुसक्या आवळल्या होत्या.व त्यांना पोलीस ठाण्यात आणून आरोपी बहीण व तिची आई व प्रियकर यांना पोलिसी हिसका दाखवला असता पहिल्या दिवशी त्या कबूल झाल्या नव्हत्या.मात्र सलग दुसऱ्या दिवशी तपास सुरु ठेवला होता.त्यात त्यांनी हि कबुली दिली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसांनी यात मयत मुलीची बहीण कु.सृष्टी नवनाथ बानकर (वय-१९) हिच्या विरुद्ध खून केल्याचा भा.द.वि.कलम ३०२ अन्वये गुन्हा दखल केला आहे.त्यानंतर नवनवीन खुलासे होत आहे.त्यात हा नवीन खुलासा झाला आहे.

दरम्यान या तपासात पोलिसांना असे आढळल्या प्रमाणे सदर आरोपी बहीण सृष्टी बानकर हिला आधी पाहायला नंतर झालेला प्रियकर आकाश राजेंद्र कांगुणे हा आला होता.मात्र घरी आई-वडिलांनी त्या वरास ना पसंत केले होते.मात्र सदर तरुण चालक असल्याचे या मार्गावरून जाता-येता सदर कुटुंबियांच्या हॉटेलवर वारंवार चहा पिण्याच्या निमित्ताने थांबत होता.व त्याची नजर हि आरोपी तरुणी सृष्टी बानकर हिच्यावर होती.त्यातून दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून संपर्कासाठी त्याने तिला भ्रमणध्वनी भेट म्हणून दिला होता.तो भ्रमण ध्वनी तिने बहिणीच्या चूकीच्या वागणुकीला कंटाळून आपल्या आई-वडिलांना पकडून दिला होता.व तिचे प्रेम प्रकरण उघड केले होते.याचा तिच्या मनात राग होता.आरोपी बहीण घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना मयत बहीण कु.हर्षदा बानकर हिने तिला विरोध केला होता.त्याचा राग मनात धरून आरोपी बहीण सृष्टी बानकर हिने तिचा दि.३० सप्टेंबर रोजी ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला होता.घटना घडली त्यावेळी सदर मयत मुलीचे वडील शिंगणापूर येथे दर्शनाला तर आई हॉटेलवर होती याची संधी साधून तिने हा डाव घडवून आणला होता.घरी सकाळी कोणीच नाही हि संधी साधून तिने आपले चंबू-गबाळ भरले ती बाब मयत बहिणीच्या लक्षात आल्याने तिने तिला पळून जाण्यास चांगल्या हेतूने व घराची व कुटूंबाची अब्रू जायला नको अशा अर्थाने विरोध केला होंता.तिच्या चांगल्या भावनेने तिचा घात केला असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान या घटनेतील आरोपी तरुणी सृष्टी बानकर हिला आज कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.बनसोडे यांच्या समोर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत दाते यांनी हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी तरुणीस ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती मिळाली आहे.फिर्यादीच्या वतीने अड्.शेख मॅडम यांनी बाजू मांडली आहे.तर आरोपीच्या वतीने अड्.जयंत जोशी,अड्.व्ही.पी.ख्रिस्ते यांनी बाजू मांडली आहे.

दरम्यान याबाबत पोलिसांनी तिचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन केले होते.त्याचा अहवाल काल दि.५ ऑक्टोबर रोजी प्राप्त झाला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘तो’ मृत्यू “गळा दाबून झाल्याचा” अहवाल दिला असल्याने पोलिसांनी आरोपी बहिण सृष्टी बानकर हिच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद हि रद्द करून या प्रकरणी आरोपी तरुणीची आई संगीता नवनाथ बानकर हिने क्रं.३०२/२०२२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने हत्या केली त्याच दिवशी कोपरगाव येथील न्यायालयात न्यायिक विवाह केला असल्याची माहिती माहितगार सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.व तो आपल्या नव्या बायकोचे स्वप्न पाहत आपल्या मुळगावी खंडाळा येथे रवाना झाला होता.सदर घटनेचे बाबत सदर आरोपी तरुणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती अशी माहिती उघड झाली आहे.त्याला जेंव्हा पोलिसांनीं अटक केली त्यावेळी त्याच्यावर पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केली त्या वेळी त्याने या बाबत आपल्याला काहीही माहिती नाही असा बचाव केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान या घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस उपविभागागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close