जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

राहाता तालुक्यातील…या वि.का.संस्थेची निवड बिनविरोध

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
लोहगाव-(कोंडीराम नेहे)
राहता तालुक्यातील आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोहगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बरोबर अध्यक्ष राजेंद्र चेचरे,उपाध्यक्ष विजय चेचरे यांची निवडणूक बिनविरोध निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या संस्थेच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र केरूनाथ चेचरे यांच्या नावाची सूचना गणेश भाऊसाहेब चेचरे यांनी मांडली त्यास कोंडीराम परसराम नेहे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्ष पदासाठी विजय हरिभाऊ चेचरे यांच्या नावाची सूचना राजेंद्र चंद्रभान चेचरे यांनी मांडली त्यास किरण अण्णासाहेब चेचरे यांनी अनुमोदन दिले आहे.सर्वानुमते अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सदाफळ यांनी जाहीर केले आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संस्थेची पाच वर्षासाठी निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली या संस्थेत बिनविरोध निवडून आलेले सदस्य सर्व राजेंद्र केरूनाथ चेचरे,गणेश भाऊसाहेब चेचरे,विजय हरिभाऊ चेचरे,राजेंद्र चंद्रभान चेचरे,किशोर हौशिराम दरंदले,बाबासाहेब हौशीराम चेचरे,किरण अण्णासाहेब चेचरे,कोंडीराम परसराम नेहे, महिला राखीव अनिता किशोर तुरकणे,पुष्पलता बाबासाहेब चेचरे,इतर मागासवर्गीय किरण रघुनाथ इनामके,भटक्या विमुक्त जाती लक्ष्मण नामदेव तांबे,आदी बारा सदस्य निवडून आले होते.

नूतन सदस्यांची सभा निवडणूक निर्णय अधिकारी आर.बी.सदाफळ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र वसंतराव चेचरे यांनी संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.यावेळी सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली आहे.अध्यक्षपदासाठी राजेंद्र केरूनाथ चेचरे यांच्या नावाची सूचना गणेश भाऊसाहेब चेचरे यांनी मांडली त्यास कोंडीराम परसराम नेहे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्ष पदासाठी विजय हरिभाऊ चेचरे यांच्या नावाची सूचना राजेंद्र चंद्रभान चेचरे यांनी मांडली त्यास किरण अण्णासाहेब चेचरे यांनी अनुमोदन दिले आहे.सर्वानुमते अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सदाफळ यांनी जाहीर केले आहे.

यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला आहे.लोहगाव ग्रामपंचायतीच्या वतीने या वेळेस नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला होता.लोहगाव मध्ये भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे यांचे दोन गट आहे.एक गट विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक केरूनाथ चेचरे यांचा तर.दुसरा गट ॲड.बाबासाहेब चेेचरे यांचा.विखे पाटील कारखान्याचे माजी तज्ञ संचालक भाऊसाहेब चेचरे यांचा भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील सांगतील त्या गटाला गावाची सत्ता मिळत असते. विरोधी तिसऱ्या गटाचे या गावात अस्तित्व शिल्लक नाही .त्यामुळे दोन्ही गट विखे पाटलांचे .आमने सामने लढतात. म्हणजे चेचरे विरुद्ध चेचरे असा सामना या गावात होत असतो .त्यास नात्यागोत्याचे ही राजकीय तितकेच महत्त्वाचे आहे.या वर्षी केरूनाथ चेचरे गटाने तरुणांना संधी देण्याचे ठरवले होते.त्याच प्रमाणे त्यांनी तरुण उमेदवारही दिले.दुसरा गट ॲड.बाबासाहेब चेचरे व विखे पाटील माजी संचालक भाऊसाहेब चेचरे यांनी ही उमेदवारी दिले

होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close