जाहिरात-9423439946
सहकार

सहकारातून स्वाहाकार साधणाऱ्या प्रवृत्तीस सहकारात प्रवेश बंद व्हायला हवा-अनास्कर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सहकारातून स्वाहाकार साधणाऱ्या प्रवृत्तीस सहकारात प्रवेश बंद झाला तरच खऱ्या अर्थाने सहकाराचे व सभासदांचे कल्याण होईल असे प्रतिपादन राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“सहकार चळवळ स्वाहाकारामुळे बदनाम झाली आहे.त्यामुळे आगामी काळात सहकारातून सभासदांची समृद्धी दिसायला हवी.कोपरगावात आल्यावर ‘ती’ समृद्धी आपल्याला समतात आढळून आली आहे.सहकार खऱ्या अर्थाने या संस्थेचे प्रमुख ओमप्रकाश कोयटे हे जगतात”-विद्याधर अनास्कर,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक.

राज्य सहकारी चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाला प्रवरा नगर येथून आज दुपारी चार वाजता राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी राज्य सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,राज्य पेस्टीसाईड संघटनेचे माजी अध्यक्ष कैलास ठोळे,संचालक संदीप कोयटे,जेष्ठ संचालक आर.टी.पटेल,शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे,समताचे संचालक जितुभाई शहा,गोटुभाई बागरेचा,समताचे महाव्यवस्थापक सचिन भट्टड,वसुली विभागाचे प्रमुख व नगरसेवक जनार्दन कदम आदी मान्यवर उपस्थित होते.सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,सहकार चळवळ स्वाहाकारामुळे बदनाम झाली आहे.त्यामुळे आगामी काळात सहकारातून सभासदांची समृद्धी दिसायला हवी.कोपरगावात आल्यावर ‘ती’ समृद्धी आपल्याला आढळून आली आहे.सहकार खऱ्या अर्थाने या संस्थेचे प्रमुख ओमप्रकाश कोयटे हे जगतात.जसा एखादा शिक्षक आपले संपूर्ण जीवन हे विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्जनासाठी वाहून घेतो तसेच आपले जीवन कोयटे यांनी सहकारातील पतसंस्था चळवळीला वाहून घेतले आहे.याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो.हे असे झोकून देऊन जगणे असते ते खरे सार्थ व उत्साहवर्धक जगणे असते असा उल्लेख करून त्यांनी आपण कोपरगावात आलो नसतो तर ती मोठी चूक ठरली असती.तंत्रज्ञान व व्यवहार याचा त्यांनी व त्यांचे सुपुत्र संदीप कोयटे यांनी सुरेख मेळ घातला आहे.नवीन तंत्रज्ञान योग्य ठिकाणी वापर करणे हे खरे कौशल्य आहे.व त्या बाबतीत आपण प्रभावित झालो असून आगामी काळात आपण आपला महिला कर्मचाऱ्यांना घेऊन येणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.”सहकार उद्योग भवन” हा चांगला उपक्रम समता पतसंस्थेने राबवला असून सहकारात नवनवीन प्रयोग हा तर आत्मा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.त्या वेळी त्यांनी आपण सहकारी बँकेचे अध्यक्ष असलो तरी आपण ‘त्या’ बँकेच्या बंगला,गाडी,नोकर-चाकर आदी सुविधांचा अभावाने व किमान पातळीवर वापर करतो” असे सांगितले असून हि साधने मिळाली की बऱ्याच वेळा हाव वाढते व त्यातून त्या साधनांचा दुरुपयोग होऊ शकतो व विनाकारण माणसाच्या नशिबात बदनामी येऊ शकते असे कारण सांगितले आहे.सदर प्रसंगी त्यांनी,”बँका व पतसंस्था यात फक्त धनादेशाचा फरक राहिला असून सहकारी बँकांच्या पतसंस्था उपघटक बनल्या तर त्या सहकारी बँकेचे धनादेश वापरू शकतील व त्याचा वापर आपल्या सभासदांना,कर्जदारांना करू शकतील परिणामस्वरूप सभासदांना बँकांचे उंबरे झिजविण्याची वेळ येणार नाही” असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला आहे.”समता पतसंस्थेने ठेवीदारांना जे संरक्षण दिले आहे.ते कौतुकास्पद आहे.त्यामुळे ठेवी वाढण्यास मदत होईल”.या प्रसंगी त्यांनी,”सहकारात कितीही मोठे व्हा पण बँका होऊ नका” असा सहकारी पतसंस्था चळवळीतील पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला आहे.त्यातून तळागाळातील नागरिकांचे बंध तुटण्याचा धोका त्यांनी दाखवून दिला आहे.बँकांचे परवाना राज व त्यातून रिझर्व्ह बँकेची जाचक बंधने येतात असे सांगून,” एक परीपत्रक आले की लगेच दुसरे येते त्याचा अर्थ निघेपर्यंत दुसरे हजर होते.त्यातून नागरिक व ठेवीदार यांचे बंध तुटण्याचा धोका असल्याचा इशारा” दिला आहे.”बँक चळवळीतील बरेच लोक पतसंस्थांकडे व्यावसायिकता नाही” असा आरोप करतात मात्र समता चळवळ पाहून हा आरोप खोटा ठरत असल्याचे सांगितले आहे.समाजातील काही माणसांचे बंध व मनाच्या तारा एकदा भेटलो तरी जुळतात तर काहीच्या तीस-चाळीस वर्ष जवळ असूनही जुळत नाही.मात्र कोयटे हे गृहस्थ आपल्याला पहिल्या श्रेणीतील असल्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.सदर प्रसंगी कोयटे यांनी,”आज प्रवरा नगर येथील सभेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे उपस्थितीत सहकारातील मर्मावर बोट ठेवण्याचे काम धाडसाने केले आहे.व त्यातून सहकारातील धोके,व पळवाटा दाखवून या चळवळीतील दूरदृष्टी दाखवून दिली आहे.एरवी सहकार विभागाला चर्चेचे वावडे असते.मात्र त्यांनी सहकाराला नवी दिशा दिली आहे.भाजपच्या काळातही त्यांनी सहकारी बँक बुडून जाणार अशा वावड्या उठल्या होत्या मात्र त्यांनी त्या खोट्या ठरवून राज्य बँक नफ्यात आणून दाखवली आहे.व ते त्या बँकेच्या कुठल्याही सुविधांचा लाभ घेत नाही असा दावा केला आहे.सहकारी बँकांकडे रिझर्व्ह बँकेचा दृष्टिकोन सापत्नभावाचा आहे. मात्र आगामी काळात बँकेचे अध्यक्ष अनास्कर त्यातून योग्य मार्ग काढतील असा विश्वास व्यक्त केला आहे.त्यावेळी कैलास ठोळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.व दोन सहकारातील राज्यस्तरीय दिग्गज आज एकत्र आले असून त्यातून नक्कीच राज्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.सदर प्रसंगी समताचे अध्यक्ष कोयटे यांनी अनास्कर यांचा समताच्या सहकार उद्योग भवनच्या वस्तू,शाल,श्रीफळ देऊन तर ठोळे यांनी पीपल्स बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार केला आहे.उपस्थितांचे आभार संदीप कोयटे यांनी मानले आहे.प्रथम अनास्कर यांनी पतसंस्था सर्व विभाग फिरून पाहणी केली व संस्थेचे विविध उपक्रम पाहून कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close