जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील ‘त्या’बॅनर्सचा आणि आमचा संबंध नाही-मंटाला

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात वर्तमानांत व पाणी कुठुन द्यायचे या वादातून सुरु असलेल्या,”दारणा की निळवंडे” या वादातून सध्या जी चौकाचौकात जी बॅनरबाजी सुरु आहे.त्यातून नामसाधर्म्यामुळे अनेकांनी आम्हाला दूरध्वनीवरून विचारणा केली आहे.त्यामुळे त्या बॅनर्सचा आणि आमचा काहीही संबंध नाही असा खुलासा शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

“घरात वापरली जाणारी विज कोठून येते ? तिची निर्मिती कुठे होते ? कोठुन आपल्याला ती येते,किंवा कोणत्या विज केंद्रातून येते,वापरतांना आपण याचा कधी विचार करतो का ? शहरातीलच नाही तर राज्यातील नागरिकांनी शासनाला कधी अशी मागणी केली की,”आम्हाला एखाद्या विशिष्ठ केंद्रातुनच विज पुरवा”आपली मागणी इतकीच असते आम्हास निरंतर,अखंडीत विज पुरवठा करा.तद्वतच शासनानेच ठरवायचे आहे की शहराला नियमित,दररोज व स्वच्छ पाणी कसे व कोठून द्यायचे त्यासाठी त्यांनी लाखो रुपये पगार मोजून तज्ज्ञांची नियुक्ती केलेली आहे.धोरण ठरवणे हा शासनाचा विषय आहे.या विषयात राजकीय लुडबुड अस्थायी आहे”-राजेश मंटाला,माहिती अधिकार कार्यकर्ते.

कोपरगांव शहरास निळवंडे व दारणा धरणापैकी कोणत्या धरणातुन पिण्याचे पाणी मिळाले पाहीजे.स्वच्छ पाणी कोणते ? यावरून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शहरातील नागरिकांना बनविण्याचा जो फंडा सुरु आहे.त्या वरून शहरात वर्तमानात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.वास्तविक याबाबत ‘जनशक्ती न्यूजसेवा’ या न्यूज पोर्टलने सप्रमाण प्रकाशझोत टाकून राजकीय नेत्यांचा भंडाफोड केला आहे.व त्यातील सत्य जनतेसमोर आणले आहे.त्या बाबत शहरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना आज कोपरगाव शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते व पाणी प्रश्नाचा अभ्यास असणारे कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस देऊन संधिग्ध पणे शहरात,”दारणा की निळवंडे” तुलना करून व काही छायाचित्रे प्रसिद्ध करून शहरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम यथाशक्ती सुरु आहे.त्यात खालच्या बाजूस एका,”जनआंदोलन समिती”चा उल्लेख करून जनतेत संभ्रम करण्याचा प्रयत्न केला आहे.तो वास्तविक तथ्याला धरून नाही.व त्यातून जनतेत संभ्रम करून आगामी मतपेट्यांची तजवीज करण्यासाठी शहरातील जनतेला वेड्यात काढण्याचे काम जोरकसपणे सुरु आहे.त्याचा व आमच्या आंदोलनाचा काही संबंध नाही.व सदरचे बॅनर आम्ही लावले नाही.एरवी किरकोळ गोष्टीसाठी वर मोठ्या आकारात स्वतःची छबी व खाली कार्यकर्त्यांच्या मुंडक्यांची माळ प्रसिद्ध करण्यास आसुसलेल्या नेत्यांना या बॅनर खाली आपली छबी टाकण्याची लाज का वाटली ? असा सवाल निर्माण झाला आहे.हेतू शुद्ध असेल तर त्यातून पळ काढण्याची गरज नाही मात्र या ठिकाणी समितीचे नाव दुसऱ्याचे वापरून हा प्रयोग करून,”जनतेला बनविण्याचा धंदा” उघड झाला आहे.जनतेला पाणी कुठूनही द्या काही देणे-घेणे नाही.काही माध्यम प्रतिनिधींनी स्थानिक पातळीवरील दिलेल्या बातम्या बघीतल्या त्यात लोकांना प्रश्न विचारले आहेत की,”तुम्हाला कोणत्या धरणातून पाणी पाहीजे ? हा प्रश्नच नागरिकांना विचारणे अस्थायी आहे.कारण पाणी कुठुन द्यायचे ? हा शासन धोरणाचा प्रश्न आहे.शासनाने कोपरगावसाठी जी योजना योग्य असेल ती घ्यायची आहे.आणि ते शासनच ठरवेल.यात कोणीही राजकीय लुडबुड करणे हिताचे नाही.
ज्याप्रमाणे घरात विज येते तिची निर्मिती कुठे होते.कोठुन आपल्याला येते,मिळते किंवा कोणत्या विज केंद्रातून येते,वापरतांना आपण याचा कधी विचार करतो का ? शहरातीलच नाही तर राज्यातील नागरिकांनी शासनाला कधी अशी मागणी केली की,”आम्हाला एखाद्या विशिष्ठ केंद्रातुनच विज पुरवा”आपली मागणी इतकीच असते आम्हास निरंतर,अखंडीत विज पुरवठा करा.तद्वतच शासनानेच ठरवायचे आहे की शहराला नियमित,दररोज व स्वच्छ पाणी कसे व कोठून द्यायचे त्यासाठी त्यांनी लाखो रुपये पगार मोजून तज्ज्ञांची नियुक्ती केलेली आहे.धोरण ठरवणे हा शासनाचा विषय आहे आणि त्यांनीच योग्य तो निर्णय घेणे अभिप्रेत आहे.शासनाला आमची इतकीच विनंती आहे की,”दररोज पाणी मिळावे,यासाठी ज्या उपाय योजना त्रुटी दूर करण्यासाठी ज्या बाबी करावयाच्या आहे त्या शासनाने दूर कराव्या व आमची पाण्याची समस्या लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडवावी”आमच्या सारख्या शहरातील सामान्य नागरिकांची किमान एवढीच अपेक्षा आहे.या विषयात कोणीही राजकीय नेत्याने हस्तक्षेप करू नये.पिण्याच्या पाण्यासारख्या जीवनावश्यक विषयात कोणीही राजकारण करू नये हे उत्तम.कारण जर हस्तक्षेप झाला तर होणारी योजना होणार नाही.आणि पुन्हा अनेक वर्षे वाट बघावी लागेल असा धोकाही मंटाला व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close