जाहिरात-9423439946
सहकार

आर्थिक संस्थांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना महत्वाच्या-मार्गदर्शन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील समता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थिती सरकारी बँकेला लाजवेल अशी असून महाराष्ट्रात होत असलेल्या दरोड्याच्या घटनांमुळे बँका,पतसंस्थांनी विविध उपाय योजना तयार करणे महत्त्वाचे आहे.पतसंस्थांच्या प्रत्येक अधिकाऱ्यापासून ते शिपायांपर्यंत प्रसंगावधान,समयसूचकता साधून स्वतःच्या सुरक्षितते बरोबरच संस्थेची आर्थिक सुरक्षा करता आली पाहिजे असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता पतसंस्थांना दरोडा प्रतिबंध सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक पतसंस्थेने विविध उपाय योजना करून त्या राबविणे काळाची गरज बनली आहे.त्याबाबत समता नागरी पतसंस्थेने सुरक्षिततेच्या बाबतीत नियोजन केले आहे हि समाधानाची बाब आहे”-वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक,कोपरगाव शहर पोलीस ठाणे.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ‘पतसंस्था दरोडा प्रतिबंध सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजना’ या विषयावर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे दूर चलचित्रवाहीनींच्या माध्यमातून मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी समताचे संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,जेष्ठ संचालक अरविंद पटेल,चांगदेव शिरोडे,संदीप कोयटे,गुलशन होडे,सरव्यवस्थापक सचिन भट्टड,मुख्य कार्यालयाचे अधिकारी,शाखाधिकारी,कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता पतसंस्थांना दरोडा प्रतिबंध सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक पतसंस्थेने विविध उपाय योजना करून त्या राबविणे काळाची गरज बनली आहे.त्याबाबत समता नागरी पतसंस्थेने सुरक्षिततेच्या बाबतीत नियोजन करण्यात आले असून त्या बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.व विविध उपाय योजनांबाबत कर्मचाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
सदर प्रसंगी पो.नि.देसले यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष कोयटे यांनी केले तर जेष्ठ संचालक अरविंद पटेल यांच्या हस्ते शाल आणि समता महिला बचत गटाच्या महिलांनी अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार केलेला गुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सदर दुरचालचित्र प्रणालीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या चर्चासत्राचे सुत्रसंचलन ई.डी.पी.विभागप्रमुख योगेश आसने यांनी केले तर उपस्थितांचे आभार जेष्ठ संचालक अरविंद पटेल यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close