विविध पक्ष आणि संघटना
राष्ट्रवादीचा कोपरगावात कार्यकर्ता मेळावा का होत आहे ?
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार हे ८१ व्या वर्षात पदार्पण करत असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा रविवार दि.०६ रोजी दुपारी ०३ वा.कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांनी दिली आहे.त्यामुळे हा मेळावा का होत आहे ? असा सवाल सामान्य जणांच्या मनात निर्माण झाला आहे.
राज्यात आता राष्ट्रवादी हा सत्ताधारी गटातील सर्वात सशक्त पर्याय असला तरी हा पक्ष बावीस वर्षात राज्याच्या एकूण मतांपैकी केवळ पंचवीस टक्क्यांच्या आसपास रेंगाळतो आहे.त्यामुळे पक्षवाढीसाठी हा मेळावा कोपरगावात संपन्न होत आहे.सन २०१५ साली पराभव झाल्यावर माजी आ.अशोक काळे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला.त्यानंतर त्याचे चिरंजीव आ.आशुतोष काळे यांनी गत विधानसभा निवडणुकीत भाजप कोल्हे गटाला धूळ चारून बाजी मारली आहे.त्याचे बक्षीस म्हणून व कोल्हेना खिजविण्यासाठी व उत्तर नगर जिल्ह्यात माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांना शह देण्यासाठी त्यांना नुकतेच साई संस्थानचे अध्यक्षपद देऊ केले आहे.आता त्यांच्या पुढे आगामी नगरपरिषद,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षवाढीचे आव्हान आहे.
दि.१८ जुलै इ.स.१९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार,काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते.इ.स. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली.त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले.पुढे नऊ वर्षांनी त्यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.तर सोनिया गांधींच्या विरुद्ध सन-१९९९ परदेशीच्या मुद्यावरून राष्ट्रवादीची स्थापना केली.त्या नंतर ते पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसशी हात मिळवणी करून केली.तर २०१९ ला बलिष्ठ बनलेल्या भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना महाआघाडी सरकारचे मुख्य प्रवर्तक बनले आहे.त्यांचा जीवनक्रम अनेक संघर्षानी भरलेला आहे.राज्यात आता राष्ट्रवादी हा सत्ताधारी गटातील सर्वात सशक्त पर्याय असला तरी हा पक्ष बावीस वर्षात राज्याच्या एकूण मतांपैकी केवळ पंचवीस टक्क्यांच्या आसपास रेंगाळतो आहे.त्यामुळे पक्षवाढीसाठी हा मेळावा कोपरगावात संपन्न होत आहे.सन २०१५ साली पराभव झाल्यावर माजी आ.अशोक काळे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला.त्यानंतर त्याचे चिरंजीव आ.आशुतोष काळे यांनी गत विधानसभा निवडणुकीत भाजप कोल्हे गटाला धूळ चारून बाजी मारली आहे.त्याचे बक्षीस म्हणून व कोल्हेना खिजविण्यासाठी व उत्तर नगर जिल्ह्यात पवारांचे कट्टर राजकीय विरोधक माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांना शह देण्यासाठी त्यांना नुकतेच साई संस्थानचे अध्यक्षपद देऊ केले आहे.आता आ.काळे यांचेपुढे नगर उत्तर जिल्ह्यात पक्ष वाढीचे आव्हान आहे.त्यासाठी हा मेळावा संपन्न होत आहे.या पूर्वी साई संस्थान मध्ये माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना उपाध्यक्षपद तर तुलनेने कनिष्ठ व अननुभवी असलेले आ.जयंत ससाणे यांना अध्यक्षपद देऊन राजकीय अवमूल्यन केले होते हे अनेकांच्या स्मरणात असेल.त्या तुलनेने नवखे व अननूभवी असताना पवारांनी आ.काळेंना थेट साई संस्थानचे अध्यक्षपद व रयतचे शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग प्रमुख पद देऊन सन्मान केला आहे.त्याची परतफेड करण्याची जबाबदारी आगामी नगरपरिषद निवडणुका व जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकात त्यांच्यावर येऊन पडली आहे.हे ओघाने आलेच.त्या दृष्टीने या मेळाव्याकडे पाहिले जात आहे.
“०६ डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.त्यावरून राष्ट्रवादीच्या नवख्या व तरुण फळीच्या हातात या पक्षाने सूत्रे सोपवली असल्याचे दिसून येत आहे.