सहकार
गणेश कारखान्याची चलअचल मालमत्ता जप्त करून कामगारांची देणी द्या-उच्च न्यायालयाचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
डॉ.पद्मश्री विखे पाटील कारखाना युनिट-२ मधील सेवानिवृत्त कामगारांची सेवा निवृत्तीची रक्कम वसुली साठी टाळाटाळ करणाऱ्या गणेश कारखान्याची मालमत्ता विकून रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा कामगार न्यायालयाने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना मालमत्ता विक्रीचे अधिकार प्रदान करून करूनही या कामगारांना न्याय न मिळाल्याने त्यांनी पुन्हा खडपीठाकडे दाद मागितल्याने न्यायालयाने येत्या सहा महिन्यात चलअचल मालमत्तेचे विवरण देऊन वेळ प्रसंगी कारखान्याची मालमत्ता जप्त करून कामगारांचे थकित पगार व थकीत सेवानिवृत्ती वेतन द्यावे असा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाने नगर जिल्हाधिकाऱ्यांना दिला असून कारखाना व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे.या बाबत नुकतीच माहिती कामगार नेते रमेश देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
आमच्या हक्काची सेवानिवृत्तीची रक्कम व कामगार न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तीस दिवसात कारखाना व्यवस्थापनाने तत्काळ अदा करावी अन्यथा अठरा टक्के दर व्याजाप्रमाणे ती आम्हास मिळावी अशी मागणी केली होती.या प्रमुख मागण्यांसाठी साधारण पाच वर्षे झालेले आहे मात्र नाठाळ कारखाना प्रशासन व त्यांचे नेते त्याकडे दुर्लक्ष करत होते मात्र जिल्हा कामगार न्यायालयाने आता जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊनही त्याला कारखाना प्रशासनने व पुढाऱ्यांनी दाद दिली नव्हती त्यामुळे त्यांनी हि बाब औरंगाबाद खण्डपीठाच्या निदर्शनास आणली होती. या निर्णयाने कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे”-रमेश देशमुख,सेवानिवृत्त कामगार नेते.
या प्रसंगी रमेश देशमुख बोलतांना म्हणाले की,”आमचे वेतन गणेश कारखान्याकडे आमच्या हक्काची सेवानिवृत्तीची रक्कम बाकी असून कामगार न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तीस दिवसात कारखाना व्यवस्थापनाने तत्काळ अदा करावी अन्यथा अठरा टक्के दर व्याजाप्रमाणे ती आम्हास मिळावी अशी मागणी केली होती. या प्रमुख मागण्यांसाठी अंदाजे तीन ते पाच वर्षे झालेले आहेत.वेळोवेळी लिखित व तोंडी स्वरुपात संबंधितांकडे या संदर्भात लेखी मागणी केलेली आहे.परंतु अद्याप पर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही.कारखाना नेतृत्व आणि प्रशासन यांनी आपले कान व डोळे बंद करून हाताची घडी घालून या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.या कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचार्यांना पगार व सेवानिवृत्ती रक्कम न मिळाल्याने त्यांच्या आजारपणाच्या काळात ते औषधोपचार देखील करु शकत नाहीत.यामुळे अनेकजण मयत झालेले आहेत.अनेकांना जीर्ण आजारांनी त्रस्त झालेले आहे.त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांचे हाल सुरु असून,उदरनिर्वाह करणे देखील अवघड झालेले आहेत.यामुळे यासर्व बाबींचा संबंधितांनी योग्य तो विचार करुन तातडीने या सर्व मागण्या मान्य कराव्यात,असे आवाहन डॉ.विखे पाटील सारखा कारखाना गणेश युनिट-२ च्या साखर कामगारांनी केले होते त्याला गणेश कारखाना प्रशासनाने दाद दिली नव्हती.
या संदर्भात साखर आयुक्त पुणे यांनी श्री गणेश कारखाना यांना दिनांक २६ मे रोजी २०१४ पासून देणी रक्कम रु.८७ कोटी लिखित स्वरुपात स्विकारलेली असताना सुद्धा ती अद्यापर्यंत कामगारांपर्यंत पोहचलेली नाही.यामुळे अनेक कामगारांची हालअपेष्टा सुरु असल्याची माहिती सेवानिवृत्त कामगार नेते रमेश देशमुख,सुभाष सांबारे,नारायण भुजबळ,कारभारी घोगळ,रामराव जाधव,गिताराम शेलार,अरुण तुपे आदी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.व वेळेत हि देणी दिली नाही म्हणून आम्ही जिल्हा कामगार न्यायालयाकडे उच्च न्यायालयाचे वकील अड.अजित काळे व अड.वैभव देशमुख यांच्या मार्फत न्याय मागितला होता.व थकीत रकमेला वसूल होई पर्यंत दहा टक्के व्याज वसूल करण्यास संमती दिली आहे.व ही रक्कम महसूल अधिनियमाच्या थकीत वसुली प्रमाणे वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.तरीही हि रक्कम या कामगारांना मिळालेली नाही हे विशेष ! त्या विरोधात या कामगारांनी अखेर पुन्हा उच्च न्यायालयाचे उंबरे झिजवले आहे.त्यावर हा आदेश न्यायालयाने नगर जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.गणेश सहकारी साखर कामगारांचे हे आर्थिक शोषण सध्या जिल्ह्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून या बाबत गणेश सहकारी कारखान्याच्या कामगारातही अस्वस्थता असल्याचे दिसून आले आहे.कामगारांची हि हेळसांड सेवानिवृत्तीनंतरही संपलेली नाही.