सहकार
..या सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या लोहगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली आहे.
संस्थेच्या सभेस यावेळी पहिल्यांदाच गावातील व परिसरातील अवैध धंदे या विषयावर चर्चा करण्यात आली ग्रामसभेत अवैध व्यवसायांवर ठराव घेऊन ही कुठल्याही प्रकारचे संबंधित विभागाचे अधिकारी कारवाई करत नाही.लेखी व तोंडी सूचना केल्यास संबंधित विभागाचे अधिकारी तक्रार करणा-याचे नाव कळवतात त्यामुळे तक्रार करणाऱ्या या व्यवसायात बरोबर रोष पत्करावा लागतअसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
या वेळी संस्थेचे सचिव आर्.व्हि.चेचरे.यांनी संस्थेचे प्रोसिडिंग वाचन केले यावेळी सर्व विषयावर साधक बाधक चर्चा करून मंजूर करण्यात आले सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे .तज्ञ संचालक भाऊसाहेब चेचरे माजी सरपंच गणेश चेचरे,उपाध्यक्ष अशोक चेचरे,दत्तात्रय चेचरे लक्ष्मण चेचरे,अण्णासाहेब चेचरे,गोरक्ष गोपाळ,कृष्णा चेचरे,पत्रकार कोडीराम नेहे,आदींनी चर्चेत भाग घेऊन संस्थेबद्दल विविध विषयावर प्रगतीपथावर कशी नेण्यात येईल या विषयावर चर्चा करण्यात आली आहे.
क़ोरोना चा नियम व सुरक्षित अंतराचे पालन तंतोतंत करण्यात आली होती.यावेळी संस्थेचे संरक्षित भिंत चांगल्या पद्धतीने तयार करून सुशोभित करण्यात यावी अशी सूचना तज्ञ संचालक भाऊसाहेब चेचरे यांनी मांडली.संस्थेचे कार्यलया प्रागणात पोव्हिग ब्लॉग बसून घेण्यात यावी अशी सूचना संस्थेचे उपाध्यक्ष अशोक चेचरे यांनी मांडली.संस्थेच्या भाग भांडवलात वाढ होण्यासाठी संस्थेच्या मोकळ्या जागेवर गाळे किंवा हॉल तयार करून ते गरजूंना भाडे तत्त्वावर दिल्यास संस्थेच्या भागभांडवलात वाढ होण्यास मदत होईल अशी सूचना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे यांनी मांडली.त्याचप्रमाणे गावात कोरणाचे रुग्ण वाढू नये यासंदर्भात चर्चा करण्यात आली.कोरणा चे रुग्ण वाढ झाल्यास टाळेबंदी करावा लागेल व त्यामुळे जनतेचा रोष ओढावा लागतो त्यामुळे प्रत्येकाने आप आपली काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन करण्यात आले आहे.संस्थेच्या सभेस यावेळी पहिल्यांदाच गावातील व परिसरातील अवैध धंदे या विषयावर चर्चा करण्यात आली ग्रामसभेत अवैध व्यवसायांवर ठराव घेऊन ही कुठल्याही प्रकारचे संबंधित विभागाचे अधिकारी कारवाई करत नाही.लेखी व तोंडी सूचना केल्यास संबंधित विभागाचे अधिकारी तक्रार करणा-या चे नाव कळवतात त्यामुळे तक्रार करणाऱ्या या व्यवसायात बरोबर रोष पत्करावा लागतो कधी कळी त्या व्यवसायाच्या माणसाबरोबर तक्रारी होतात.त्यामुळे व्यक्तिगत तक्रारी करण्यास कोणीही धजावत नाही संबंधित अधिकारी व्यवसाय कडुन चिरीमिरी घेऊन हे सगळे प्रकार करतात त्याबद्दल या सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली कित्येक वेगळा ठराव देऊनही हे अधिकारी सदर ठरावास केराची टोपली दाखवतात त्यामुळे हे अवैध व्यवसाय कधी बंद होणार ? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे असे विचार याठिकाणी प्रत्येकांनी मांडले वार्षिक सर्वसाधारण सभा. खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे यांनी सर्वांचे आभार मानले.