कोपरगाव तालुका
धारणगाव रस्त्याच्या गटारीवरील पुलाचे काम बंद,नगरपरिषदेत तक्रार

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या धारणगाव रस्त्यावरील गटारीचे काम नगरपरिषदेच्या ठेकेदाराने सुरु केले मात्र अज्ञात कारणाने बंद केल्याने या मार्गावरील व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहेच पण या कामावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष असल्याचे दिसत नाही अशी तक्रार या परिसरातील जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे केली आहे.
“सदर गटारीवरील बांधकाम अधिकाऱ्यांच्या निगराणी खाली सुरु असताना या मार्गावर अवजड वाहतूक असल्याने त्याची गुणवत्ता व ते नियोजित रेखांकनाप्रमाणे आहे की नाही हे समजणे गरजेचे आहे.अन्यथा या मार्गावर पुन्हा या ठिकाणी गटारीवर पूल बांधणे अवघड होईल”उमेश धुमाळ,जेष्ठ कार्यकर्ते.
त्यांनी नगरपरिषदेकडे केलेल्या तक्रारीत म्हटली आहे की,नगरपरिषदेने आपल्या हद्दीत नुकतेच धारणगाव रस्त्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गटारीवरील पुलाचे काम सुरु केले आहे.सुरुवातीला कामाचा वेग मोठा होता,मात्र कुठे काय माशी शिंकली कळायला मार्ग नाही आणि एकदिवस नुकतेच दि.२४ मार्च पासून ते काम बंद पडले आहे.याचे कारण नागरिकांना कळले नाही.त्यामुळे या मार्गालगत अनेक व्यापाऱ्यांची दुकाने आहेत.त्याच्यावर त्यांची रोजी-रोटी अवलंबून आहे.मात्र हे काम अचानक रेंगाळले असल्याने या व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर काम बांधकाम अधिकाऱ्यांच्या निगराणी खाली सुरु असताना या मार्गावर अवजड वाहतूक असल्याने त्याची गुणवत्ता व ते नियोजित रेखांकनाप्रमाणे आहे की नाही हे समजणे गरजेचे आहे.अन्यथा या मार्गावर पुन्हा या ठिकाणी गटारीवर पूल बांधणे अवघड होईल व या मार्गावरील व्यापाऱ्यांचे व्यवसाय धोक्यात येतील व नगरपरिषदेचा निधी पाण्यात जाईल त्यामुळे या बाबत निवेदन दिले असून या प्रकरणी पालिकेच्या जबाबदार अधिकांऱ्यानी लक्ष देऊन हे काम नियोजनाप्रमाणे करावे अन्यथा याची जबाबदारी संबंधित बांधकाम विभागाची राहील असा इशारा धुमाळ यांनी शेवटी दिला आहे.
निवेदनावर गुलशन श्रीचंद हाडे,मधुकर पवार,इस्माईल शेख,समीर हिंगमीरे,केदार वाणी,जाकीर शेख,योगेश कराळे,बाबासाहेब चौधरी,गणेश शिंदे,शहनवाज कोथमिरे,मच्छिन्द्र पंडोरे,सुनील गगे,मोमीन पठाण,विशाल शिवदे,दिनेश हाडे,दिलीप गौड,अंकुश वाघ,गोकुळ हांडोरे,बाबासाहेब कोपरे,आदींच्या सह्या आहेत.