कामगार जगत
… या संघटनेचे कार्य राज्याला प्रेरणादाई -खा.वाकचौरे

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
“तांत्रिक कामगार युनियनने आपल्या ४८व्या वर्धापनदिनी चांगला उपक्रम राबवला आहे.राज्यात या उपक्रमाचे स्वागत होईल व हा उपक्रम अन्य संघटनांना मार्गदर्शक होईल असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीत एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

दरम्यान तांत्रिक युनियनच्या वतीने शिर्डी नजीक उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात तांत्रिक भवन, निवास प्रकल्प,प्रशिक्षण केंद्र,लॉन्स, क्लब हाऊस,स्विमिंग टैंक आदी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे त्याचा फायदा राज्यातील युनियनच्या सदस्यांना होणार आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र तांत्रिक कामगार युनियनचा ४८ वा वर्धापन दिन तसेच एकता प्रतिष्ठानच्या सुमारे ०६ एकर जागेत कार्यालयाचे उद्घाटन,तांत्रिक भवन,प्रशिक्षण केंद्र इमारतीचे भूमिपूजन शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभहस्ते व आ.आशुतोष काळे,संजीवनीं कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,अधिक्षक अभियंता वितरणचे प्रदिप वट्टमवार,
युनियनचे अध्यक्ष रवींद्र बाराई,भोईर,सरचिटणीस आर. टी.नितीन पवार,दिलीप क्षीरसागर, कल्याण धुमाळ,आर आर पाटील,संदीप पडुळे,गोदासेवक आदिनाथ ढाकणे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकर चव्हाण,गौतम बँकेचे संचालक शरद होन,चांदेकसारेचे सरपंच किरण होन,उपसरपंच वसीम शेख,अरविंद भादिकर आदींसह बहुसंख्येने अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना खा. वाकचौरे म्हणाले की,”महावितरण कंपनीचे संचालक राजेंद्र पवार यांच् उंचावणाऱ्या आलेखाचे कौतुक करत त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात सेक्शन ऑफिस पासून वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.आज त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे.त्याचा फायदा विद्युत ग्राहकांना होणार आहे.त्यांचे बदलीचे धोरण चांगले आहे.उर्वरित काळात ते चांगले करतील असा आशावाद खा. वाकचौरे व्यक्त केला आहे. हे कर्मचारी जोखमीचे काम करत आहे.आपली सेवा बजावताना कर्मचाऱ्यांनी व्यसनापासून दूर रहावे ग्राहकांची सेवा प्रामाणिकपणे करावी असे आवाहन केलं आहे.त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळाची आठवण जागृत करत आपण गटविकास अधिकारी ते साई संस्थांनचे कार्यकारी अधिकारी पदापर्यंत वाटचाल केल्याच्या स्मृती जागृत केल्या आहेत.तांत्रिक युनियनच्या कार्याचा गौरव केला आहे.

यावेळी आ.आशुतोष काळे यांनी व विवेक कोल्हे यांनी संघटनेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर व वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्याचा उपस्थितांनी गौरव केला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस नितीन पवार यांनी केले आहे तर सूत्रसंचालन दिलीप क्षीरसागर यांनी केले तर स्वागत कल्याण धुमाळ,आर.आर.पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदीप पडुळे यांनी मानले आहे.
मो.७०६६ २२७ २२७.