सहकार
ऊसतोड कामगारांनी आरोग्य हित जपणे महत्वाचे-…आवाहन

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
ऊस तोडणी काम हे शारीरिकदृष्ट्या अत्यंत कठीण व तणावपूर्ण असते.कडाक्याची थंडी असेल किंवा उन्हाळ्याच्या तीव्र झळा असतांना देखील ऊस तोडणी कामगार ऊस तोडणीचे काम करीत असतात.या मेहनतीच्या व अती कष्टाच्या कामामुळे ऊस तोडणी मजुरांची आरोग्याची स्थिती अनेकदा गंभीर स्वरूप धारण करू शकते.त्यामुळे ऊस तोडणी कामगारांनी नियमितपणे आपल्या आरोग्याची तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन कोपरगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ.विकास घोलप यांनी केले आहे.

“ऊस तोडणी कामगार साखर कारखान्याच्या गळीत हंगामात महत्वाचा घटक आहे.ऊसतोड कामगारांना ऊस तोडीच्या अतिशय कष्टाच्या कामामुळे स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते.त्यामुळे भविष्यात मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.हे धोके टाळण्यासाठी हे आरोग्य शिबिर नक्कीच उपयुक्त ठरणार आहे”- सुनील कोल्हे,कार्यकारी संचालक,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना.
ऊसतोड कामगार हे ऊस तोडतात.जेथे ऊस मोठ्या प्रमाणावर लावला आहे तेथे जाऊन तो साखर कारखान्यांकरता तोडणारा मजूर वर्ग म्हणजे ऊसतोड कामगार राज्याच्या सोळा जिल्ह्यांत बावन्न तालुके ऊसतोड व्यवसायात आहेत.ऊसशेती गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्रात बहरली,त्यासोबत साखर कारखाने निघाले.शेतांतील ऊस तोडून त्या कारखान्यांना पुरवणारा ऊसतोड कामगार म्हणजे स्थलांतरित मजुरांचा हा एक मोठा समुदाय.तो महाराष्ट्रात विसाव्या शतकात निर्माण होत गेला.कोपरगाव तालुक्यातील आशिया खंडातील सहकारात दुसरा गणला गेलेला सहकारी साखर कारखाना म्हणून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना गणला जातो.सरकारने या अलीकडील संघटित झालेल्या वर्गासाठी आता सरकार सजग झाले आहे.त्यासाठी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.त्याचमुळे सरकारने त्यांच्या आरोग्यासाठी काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र,चासनळी यांच्या सहकार्याने कारखान्याने ऊस तोडणी कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून २०० ऊस तोडणी कामगारांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे होते.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी यांच्या सहकार्याने ऊस तोडणी कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करतांना आरोग्य विभागाचे कर्मचारी दिसत आहेत.
ऊस तोडणी मजुरांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले आहेत.त्या निर्देशानुसार बुधवार दि.१५ जानेवारी रोजी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या वसाहतीमध्ये मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे याच्या हस्ते करण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलतांना कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे म्हणाले की,”ऊस तोडणी कामगार साखर कारखान्याच्या गळीत हंगामात महत्वाचा घटक आहे.ऊसतोड कामगारांना ऊस तोडीच्या अतिशय कष्टाच्या कामामुळे स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते.त्यामुळे भविष्यात मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.हे धोके टाळण्यासाठी कारखान्याचे मार्गदर्शक कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.या शिबिराच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून तपासणी अंती निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार केले जातात.ऊस तोडणी कामगारांनी व त्यांच्या कुटुंबांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेवून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.या आरोग्य शिबिरात ऊस तोडणी कामगारांचे रक्तदाब,रक्तातील साखरेचे प्रमाण,हिमोग्लोबीन,गरोदर महिलांची व लहान मुलांची तपासणी करण्यात येवून सर्दी,ताप,खोकला,अंगदुखी आदी आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात आले.
या मोफत आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे,सचिव बाबा सय्यद,सहसचिव संतोष शिरसाठ,मुख्य शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे,डॉ.एस.आर.जैन,ऊस विकास अधिकारी ए.आर.चिने,चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा सांजेकर,सहाय्यक अरुणा गाताडे, आर.एस.शेख तसेच आरोग्य निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.