सण-उत्सव
शिर्डी संस्थानचा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवसंस्थेच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले आहे.
या वेळी विश्वस्त मंडळाचे सदस्य सर्वश्री अविनाश दंडवते,डॉ.एकनाथ गोंदकर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे सर्व प्रशासकीय अधिकारी,विभाग प्रमुख,शैक्षणिक संकुलाचे अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी शैक्षणिक संकुलातील विविध परिक्षा व क्रीडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी उपस्थितांना शुभेच्छा देवुन मार्गदर्शन केले.तसेच विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.