सण-उत्सव
गोकुळचंदजी विद्यालयात महात्मा गांधी व माजी पंतप्रधान शास्त्री यांची जयंती संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत २ आॕक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे.
लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते.९ जून इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५ सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले.सोव्हियत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स.१९६६ रोजी विषप्रयोग झाल्यामुळे मृत्यू झाला.या दोन्ही युगपुरुषांचा जन्मदिवस एकाच दिवशी आहे.
श्री.गो.विदयालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे जेष्ठ शिक्षक दीलीप तुपसैंदर यांच्या हस्ते झाले.
या वेळी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी राष्ट्रपुरुषांना अभिवादन केले आहे.
या कार्यक्रमाला,एन.के.बडजाते,ए.के.काले,डी.व्हि.विरकर श्री.चौधरी आर.जे,शिरसाळे एस.एन,सौ.बोरावके आर.आर,रायते यु.एस,महानुभाव के.एम,आदी शिक्षक,शिक्षिका सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.
विदयालयाचे पर्यवेक्षक गायकवाड आर.बी.यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विद्यालयाचे कला शिक्षक एस.डी.गोरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.जेष्ठ शिक्षक श्री.ई.एल.जाधव यांनी आभार मानले.