कोपरगाव तालुका
आयुर्वेद तज्ञ डॉ.रामदास आव्हाड यांना पुरस्कार प्रदान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथे गेल्या तेहतीस वर्षापासून आयुर्वेदाद्वारे रुग्णसेवा करून देशभरात प्रसिद्ध झालेल्या डॉ.रामदास आव्हाड यांना यवतमाळ आयुर्वेद कॉलेज तर्फे कै. भाऊसाहेब पद्मवार यांचे स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणारा “आयुर्वेद भूषण”पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“आयुर्वेदाचे आपण भूषण नसून आयुर्वेद माझे व संपूर्ण भारताचे भूषण आहे”-डॉ.रामदास आव्हाड,औयर्वेदाचार्य,कोपरगाव.
शुक्रवार एक ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रसिद्ध संस्कृत पंडित व लेखक डॉ.स्वानंद पुंड यांचे हस्ते व डॉ.सुरेश पद्मवार, सेक्रेटरी पुरस्कार समिती यांचे उपस्थितीत देण्यात आला आहे.शाल,श्रीफळ,मानपत्र,स्मृतिचिन्ह व रोख पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
गेल्या तेहतीस वर्षात ग्रामीण भागात राहून देशभरातुन आलेल्या वैद्यवर्गाला त्यांचे रुग्णालयात प्रशिक्षित केलेल्या हजारो वैद्यकवर्गाद्वारे करत असलेल्या आयुर्वेद प्रचार प्रसार कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या पूर्वी हा पुरस्कार देशातील निवडक अशा श्रेष्ठ व वयस्कर असलेल्या नऊ वैद्यांनाच दिला गेला आहे.या कार्यक्रमानंतर पदव्युत्तर आयुर्वेद विद्यार्थ्यांसाठी डॉ. रामदास आव्हाड यांचे अनुभवावर आधारित व्याख्यान झाले.या कार्यक्रमास डॉ.सूर्यप्रकाश जयस्वाल,प्राचार्य डॉ. मुंदाने सर,व समितीचे अनेक तज्ञ् उपस्थित होते.कोरोनाचे सर्व नियम पाळत हा सत्कार समारंभ पार पडला आहे.यावेळी उत्तरादाखल डॉ.आव्हाड यांनी आयुर्वेदाचे आपण भूषण नसून आयुर्वेद माझे व संपूर्ण भारताचे भूषण असल्याचे सांगितले आहे .राष्ट्रीय आयुर्वेद गुरु असलेल्या डॉ.रामदास आव्हाडांचा हा सत्ताविसावा पुरस्कार आहे हे विशेष!