जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोविड प्रतिबंध लसीकरणाचा उच्चांक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

दि.२ ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त कोपरगाव शहरात तीन पथके स्थापन करून श्री.दत्तमंदिर,दत्तनगर,श्री.संत गोरोबाकाका मंदिर,गोरोबा नगर व न.प.शाळा क्र.५ बेट याठिकाणी कोविड प्रतिबंध लसीकरणाचा उच्चांक गाठून आज दिवसाखेर ०१ हजार ६३७ नागरिकांचे लसीकरण यशस्वी पणे पार पाडले.एवढ्या मोठ्या संख्येत लसीकरण होण्याची पहिलीच वेळ आहे.त्यामुळे नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“दि.२ऑक्टोंबर रोजी कोपरगाव शहरामध्ये तीन पथक करून श्री.दत्तमंदिर,दत्तनगर,श्री.संत गोरोबाकाका मंदिर,गोरोबा नगर व नगरपरिषद शाळा क्र.५ बेट या ठिकाणी कोविड प्रतिबंध लसीकरणाचा उच्चांक गाठून आज दिवसा अखेर १हजार ६३७ नागरिकांचे लसीकरण केले आहे.एवढ्या मोठ्या संख्येत लसीकरण होण्याची पहिलीच वेळ आहे”विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

देशात एकीकडे कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असला तरी दुसरीकडे अद्याप कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसल्याचं दिसून येतंय.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासात २४ हजार ३५४ नव्या रुग्णांची भर पडली आहे तर २३४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्येत मात्र हळूहळू घट होताना दिसत असून ती आता २ लाख ७३ हजार ८८९ इतकी झाली आहे. त्या आधी गुरुवारी देशात कोरोनाच्या २६ हजार ७२७ नव्या रुग्णांची भर पडली होती तर २७७ लोकांचा मृत्यू झाला होता.
देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून शुक्रवारी कोरोनाचे ६९ लाख ३३ हजार ८३८ डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत एकूण ८९ कोटी ७४ लाख ८१ हजार ५५४ इतके डोस देण्यात आले आहेत. याबाबत अटक कोपरगाव नगरपरिषद अपवाद राहिली नाही.त्यांनी या
कोविंड साथजन्य आजारापासून कोपरगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे या करिता कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.ए.पी.जे.अब्दुल कमाल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दैनंदिन प्रभागनिहाय लसीकरणाचे नियोजन करून शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करत आहेत.आज अखेर शहरातील एकूण पंधरा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

डॉ.गायत्री कांडेकर,रजनी मुसमाडे,लक्ष्मी पाठक,नर्स रोहिणी नाईक,सुरेखा कुमावत,शालिनी गायकवाड,नंदू नवले,पूजा नवले,विजया गायकवाड,आशा वर्कर राखी पुरोहित,मंगल गवळी,वर्षा देसाई,सुरेखा थोरात,सुवर्णा वायखिंडे,योगिता गवूल,अनिता वैद्य,सपना दाभाडे,सोनपसारे,कदम यांच्यासह लसीकरण झालेल्या व्यक्तींची कोव्हीन पोर्टल वर डाटा एन्ट्री यासाठी नियंत्रण अधिकारी भालचंद्र उबरजे,प्रवीण पोटे,पि.के.गायकवाड,सूर्यकांत गाडेकर,नियंत्रण अधिकारी महारुद्र गालट, नोडल अधिकारी ज्ञानेश्वर चाकणे आदींनी या मोहिमेत परिश्रम घेतले आहे.

या खेरीज शहरातील विविध भागातील व्यापारी,नागरिक यांची दररोज RTPCR व RAT तपासणी कॅम्प नियोजन करून दररोज सरासरी दोनशे ते दोनशे पन्नास व्यापारी,नागरिकांच्या कोविड तपासण्या सुरू आहे.यासाठी नगरपरिषदेचे स्वच्छता विभागाचे कर्मचाऱ्यांचे दोन पथक शहरातील विविध भागांमध्ये दैनंदिन कोविड तपासण्या करत आहेत.
या साठी प्रभारी स्वच्छता निरीक्षक सुनील आरण,मुकादम मनोज लोट,रवी दिनकर,विजय घोरपडे,विजय डाके,अरुण फाजगे,रणधीर तांबे,योगेश कोपरे,पवन हाडा,राजेंद्र तुजारे,तुषार, आनंद वाल्हेकर,दीपक साळवे व आरोग्य केंद्राचे कर्मचारी आदी मेहनत घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close