सण-उत्सव
कोपरगावात वटसावित्री पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. २ मधील निवारा सुभद्रानगर,रिद्धीसिद्धी नगर,साई सिटीसह आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी कोरोना महामारीच्या भयंकर संकटानंतर वट पौर्णिमेचे दिवशी एकत्र येत आनंदाने आणि उत्साहवर्धक वातावरणात वट सावित्री पौर्णिमा साजरी केली आहे.
या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे,दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.वट पौर्णिमा निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड,पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी.
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो.ह्या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे,दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.वट पौर्णिमा निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड,पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो.अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे,धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’,अशी प्रार्थना करतात कोपरगावतही हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनीं कोयटे,साई निवारा महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदिनी कदम,मंडळाच्या सदस्य वैशाली जाधव,दीपिका कुलकर्णी,जीजाताई कापे,मेघना जवरे,प्रेरणा जवरे,मीना जाधव,शोभा कदम,सौ.सरोदे,आदिंसह प्रभागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
वट सावित्री पौर्णिमे विषयीचे ऐतिहासिक महत्व सांगताना कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनीं कोयटे म्हणाल्या कि, ‘माता सावित्रीने यमदेवाकडे सत्यवानाचे प्राण याच दिवशी वडाचे झाडाखाली पुन्हा मिळविले. त्या दिवशी पोर्णिमा होती,त्या दिवसापासून सुहासिनी महिला पौर्णिमेचे दिवशी पतीच्या प्राणाचे रक्षण व्हावे आणि पतीला सत्यवाना प्रमाणे दीर्घायुष्य लाभावे यासाठी व्रत करत असतात.’
तर साई निवारा महिला मंडळाच्या अध्यक्ष नंदिनी जनार्दन कदम वट वृक्षाचा वैज्ञानिक दृष्टीकोन स्पष्ट करताना म्हणाल्या कि,एक पूर्ण वाढलेले वट वृक्षाचे झाड एका तासाला ७१२ किलो प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन सोडत असतात, त्यामुळे वडाच्या झाडाखाली जास्तीत जास्त वेळ व्यतीत करून प्राण वायू घ्यावा.