जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
व्यापार

कोपरगावात कांद्याला उचांकी भाव,शेतकऱ्यांत समाधान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कांद्याला साधारण अनेक महिन्यापासून दोन हजारांचा मिळणारा भावाने आज उसळी घेतली असून आज एक क्रमांकाच्या कांद्याने तीन हजारांचा भाव खाल्ला असल्याही माहिती कोपरगाव कृषी बाजार समितीचे प्रशासक एन.जी.ठोंबळ यांनी दिली आहे.

दरम्यान गहू आज १,८९९ ते १,८००,बाजरी १,७५१ ते १,७५१,हरभरा ४,५५०-३,७००,सोयाबीन ६,४६०-५,१५१ मका १,७८७ ते १,६८० तर तूर ५,००१ रुपयांवर स्थिरावली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,राज्यात ठीक ठिकाणी आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला आहे.सध्या बाजारात साठवून ठेवलेले कांदे राहिले नाही त्यामुळे नवीन कांद्याला मागणी वाढली आहे.कोपरगावात सध्या कांद्याचे भाव २,४५०-३००० रुपये प्रति क्विंटल चा भाव आहे.सध्या कांद्याची आवक घटल्याने कांदा महाग झाला आहे.कांद्याचे भाव एकाएकी वाढले आहे.काही महिन्यापासून साठवलेले कांदा संपला असून त्यामुळे नवीन कांद्याचे भाव वाढले असल्याचे आढळून आले आहे.कोपगावतही हेच चित्र वार्तमानात दिसून येत आहे.वर्तमानात चांगला दर्जेदार क्रमांक एकचा कांदा आज २ हजार ४५० तर ०३ हजार रुपये क्विंटलवर गेला आहे.तर माध्यम कांदा हा ०२ हजार ते ०२ हजार ४२५ तर क्रमांक तीनचा कांदा हा ०१ हजार ते १ हजार ९७५ रुपयांवर गेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना हायसे वाटले आहे.वर्तमानात कांदा लिलाव मंगळवार ते शनिवार तर भुसार मालाचे लिलाव हे सोमवार ते शनिवार रोजी होत असल्याचेही प्रशासक श्री ठोंबळ यांनी सांगितले आहे.सदर प्रसंगी बाजार समितीचे सचिव नानासाहेब रानशूर हे उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close