जाहिरात-9423439946
पाणी पुरवठा योजना

कोपरगाव तालुक्यातील पाणी योजनांचे सर्वेक्षण पूर्ण-आ.काळेंची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून पूर्ण झाले आहे.या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी मिळावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेतली आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी,सुरेगाव,कुंभारी,वारी-कान्हेगाव,मळेगाव थडी,मायगाव देवी,जेऊर कुंभारी व शिंगणापूर या गावातील पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सचिव पातळीवर पाठपुरावा सुरु आहे.त्या योजनांचा मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे”-आ.आशुतोष काळे.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी,सुरेगाव,कुंभारी,वारी-कान्हेगाव,मळेगाव थडी,मायगाव देवी, जेऊर कुंभारी व शिंगणापूर या गावातील पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ.काळे यांचा पाठपुरावा सुरु असून या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत.
या गावातील सर्वच पाणीपुरवठा योजना रुपये ५ कोटीच्या पुढे असल्यामुळे या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे वर्ग केल्या आहेत.मात्र या योजनांना तातडीने मंजुरी मिळावी त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेतली.वरील गावाबरोबरच जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या अजूनही सर्वच गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी नागरिकांना विशेषतः महिलाना पाण्यामुळे होत असलेला त्रास दूर करण्यासाठी या योजनांना तातडीने मंजुरी मिळावी अशी मागणी केली.यावेळी प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत तातडीने पुढील कार्यवाही करू असे आश्वासन दिले असल्याची माहिती आ.काळे यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close