जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष लेखमाला

प्रतीक्षा संपली,कोपरगाव साठवण तलावास अखेर निधी मंजूर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या साठवण तलाव क्रमांक ५ साठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत १३१.२४ कोटी रुपये खर्चाला दि.२५ मार्च रोजी आर्थिक मान्यता राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने दिली आहे.त्याबाबतची माहिती नुकतीच आमच्या प्रतिनिधीस मिळाली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.त्यामुळे शहराला नित्य पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.याबाबत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे व कोपरगाव साठवण तलाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते राजेश मंटाला,तुषार विध्वंस,संतोष गंगवाल,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव शहराला मुळात पाणी कमी नव्हतेच,”पाण्याची चोरी,गळती,सदोष जलवीतरण प्रणाली” या प्रमुख कारणामुळे घोळ झाला होता.मात्र पाणी कमी असल्याचा जावई शोध लावून निवडणुका जिंकण्यासाठी जनतेला मूर्खात काढण्याचा प्रयत्न जोरात सुरु होता.व आपल्या मतपेट्यांची सोय करण्यात येथील नेते पारंगत आहेत.या साठवण तलावाच्या मंजुरीमुळे आगामी काळात नगरपरिषदेवर निळवंडे प्रकल्पावरून लिफ्टिंग योजनेचे खर्चिय महागडे पाणी गळ्यात मारण्याचा प्रयत्न फसला आहे.या शिवाय निळवंडेच्या दुष्काळी १८२ गावांची साडेसाती संपल्यात जमा झाली आहे.त्यामुळे दुष्काळी गावांच्या शेती सिंचनासाठी काम करणाऱ्या निळवंडे कालवा कृती समितीने समाधान व्यक्त केले आहे.

सन-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे या बाबत श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे व तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव शहरातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून येताच दोनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाईचे काम सुरु केले होते.कोपरगाव शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी ५ नंबर साठवण तलाव महत्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे पुढील कामासाठी तांत्रिक मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२३ कोटी रुपयांच्या खर्चाला तांत्रिक मंजुरी मिळाली होती.या मंजुरीला प्रशासकीय मंजुरी मिळवून निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ.काळे व कोपरगाव साठवण तलाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते राजेश मंटाला त्यांचे सहकारी व नगराध्यक्ष विजय वहाडणे आदी पाठपुरावा करत होते.
त्या पाठपुराव्याची नगरविकास विभागाने दखल घेवून नुकतीच त्याबाबत नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई येथे प्रकल्प मान्यता समितीची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत पाच नंबर साठवण तलावाच्या १२३ कोटी रुपये निधीला प्रकल्प मान्यता समितीने मंजुरी दिली होती.मात्र आर्थिक मान्यता कधी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून होते.कारण मागील नगरपरिषदेचा कालखंड संपला होता.व आता आगामी नगरपरिषद निवडणूकीच्या मतपेट्या बंद झाल्यावरच पुढील निवडणूक येईपर्यंत वाट पाहावी लागेल असे वाटत असताना कोपरगाव साठवण तलाव संघर्ष समितीने समांतर कागदपत्रिय पाठपुरावा करून त्या प्रश्नाचा पाठपुरावा सुरु ठेवला होता.या शिवाय पंतप्रधान व मुख्यमंत्री व नगरविकास आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केला होंता.त्याचे फळ समोर आले आहे.नगर विकास खात्याने या साठवण तलावास १३४.२४ कोटींची मान्यता दिली आहे.त्यामुळे आगामी अडीच वर्षात हे काम करण्याची जबाबदारी नगरपरिषदेवर वाढली आहे.

कोपरगाव तालुक्यातील राजकारणाच्या प्रचलित शिरस्त्या प्रमाणे आगामी नगरपरिषद निवडणूकीच्या मतपेट्या बंद झाल्यावरच पुढील निवडणूक येईपर्यंत साठवण तलावाच्या मंजुरीची वाट पाहावी लागेल असे वाटत असताना कोपरगाव साठवण तलाव संघर्ष समितीने समांतर कागदपत्रिय पाठपुरावा करून त्या प्रश्नाचा पाठपुरावा सुरु ठेवला होता.या शिवाय पंतप्रधान व मुख्यमंत्री व नगरविकास आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केला होंता.त्याचे फळ समोर आले आहे.नगर विकास खात्याने या साठवण तलावास १३४.२४ कोटींची मान्यता दिली आहे.

कोपरगाव शहराला मुळात पाणी कमी नव्हतेच,”पाण्याची चोरी,गळती,सदोष जलवीतरण प्रणाली” या प्रमुख कारणामुळे घोळ झाला होता.मात्र पाणी कमी असल्याचा जावई शोध लावून निवडणुका जिंकण्यासाठी जनतेला मूर्खात काढण्याचा प्रयत्न जोरात सुरु होता.व आपल्या मतपेट्यांची सोय करण्यात येथील नेते पारंगत आहेत.या साठवण तलावाच्या मंजुरीमुळे आगामी काळात नगरपरिषदेवर निळवंडे प्रकल्पावरून लिफ्टिंग योजनेचे खर्चिय महागडे पाणी गळ्यात मारण्याचा प्रयत्न फसला आहे.या आधीच प्रवाही सिंचन पद्धतीची सुमारे दहा कोटींची पाणी पट्टी थकीत असताना श्री साईबाबा संस्थानचे फुकटच्या पाण्याचे गाजर दाखवून शहरातील नागरिकांची होणारी लुबाडणूक थांबण्यास मदत होणार आहे.बंदिस्त जलवाहिणीमुळे गोदावरी कालव्यांना येणारे पाणी बंद होणार होते व शेती सिंचन धोक्यात येणार होते.त्यामुळेच एका जलसंपदाच्या जबाबदार अधिकाऱ्याने हि बाब माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या लक्षात आणून दिल्यावर या योजनेला सन-२०११ साली माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई यांचे कालखंडात ८९ कोटींच्या बंदीस्त पाणी योजनेचा प्रस्तावास विरोध केला होता.

काहींनी या योजनेत दोन्ही ठिकाणाहून पाणी आणले तरी चालले अशी मतांसाठी लोकानुयायी ‘नरो वा,कुंजरो वा’ आश्चर्यकारक भर सभागृहात भूमिका घेतली होती.दरम्यानच्या कालखंडात दारणा धरणात बिगर सिंचनासाठी पाणी शिल्लक नाही अशी आवई भाजपच्या माजी आमदारांनी व अन्य नेत्यांनी उठवली होती.ती सपशेल खोटी ठरली आहे.पाणी शिल्लक नव्हते तर नुकतीच लाभक्षेत्राबाहेरील येवला व चाळीस गावांना राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने दि.०७ मार्च २०२२ रोजी (शासन निर्णय क्रं.बी.सिं.आ.२०२२/३५/२०२२/सिं.व्य.(धो.-२) पाणी मंजूर कसे केले ? व त्याला येथील या योजनेला विरोध का केला नाही असा गंभीर सवालही या निमित्ताने निर्माण झाला आहे.व कोपरगाव करांची फसवणूक होत होती हे या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे.
या योजनेची किंमत १३१ कोटी २४ लक्ष रुपये असून यात राज्याचा ८५ टक्के वाटा म्हणून १११ कोटी ५५ लक्ष रुपये मिळणार आहे तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग पंधरा टक्के म्हणजे १९.६८ कोटी रुपयांचा असणार आहे.त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करता येणार आहे.या योजनेचे कार्यान्वयन कोपरगाव नगरपरिषदेस करावयाचे आहे.
दरम्यान या योजनेची निविदा आगामी सात दिवसांत काढावी लागणार आहे.त्या नंतर तीन महिन्याच्या कालावधीत कार्यादेश देणे बंधन कारक करण्यात आले आहे.त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी यांचेवर टाकण्यात आलेली आहे.जर ठरवून दिलेल्या नियमानुसार हि योजना पूर्ण झाली नाही तर व्याजासह रक्कम संबधित संस्थेस द्यावी लागणार आहे.या मंजुरीवर नगरविकास खात्याचे सहसचिव पांडुरंग जाधव यांची सही आहे.

सदर प्रसंगी नगरपरिषद प्रशासन संचालयानाचे संचालक गावडे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नंदनवारे,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक,सहसचिव पांडुरंग जाधव आदींचे साई संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे,माजीं नगराध्यक्ष विजय वहाडणे,साठवण तलाव कृती समितीचे राजेश मंटाला,तुषार विध्वंस,संतोष गंगवाल,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील आदींनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close