जाहिरात-9423439946
महिला बालविकास विभाग

अंगणवाडी सेविकांना मानधनासह पेन्शन द्या-कोपरगावात मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यातील अंगणवाडी सेविकांना गेल्या अनेक वर्षात केंद्र व राज्य सरकारने वेतनवाढ दिलेली नाही त्या मुले महागाईच्या काळात त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे.त्यामुळे सरकारने त्यांना वेतनवाढ,दरमहा पेन्शन व नवीन भ्रमणध्वनी देण्याची सोय करावी अशी मागणी कोपरगाव येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून कोपरगाव तालुका अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेने नुकतीच केली आहे.

आज अंगणवाडी सेविकेस केवळ ०८ हजार ३२५ तर सेविकांना ०५ हजार ९७५ तर मंडतनिसांना केवळ ०४ हजार ४२५ इतके तुटपुंजे मानधन दिले जाते.हे मानधन किमान वेतन कायद्यापेक्षा कमी आहे हे उघड आहे.त्यात कोणाचाही उदरनिर्वाह होऊ शकत नाही.या उलट महाराष्ट्रापेक्षा केरळ,तामिळनाडू,आंध्रप्रदेश,पंजाब,दिल्ली आदी राज्यातील अंगणवाडी सेविकांना जास्त मानधन देण्यात येत आहे.त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे.

राज्यात जवळपास एक लाख अंगणवाडी सेविका आहेत.मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची संख्याही एक लाखाच्या घरात आहे.असे जवळपास दोन लाख कर्मचारी अंगणवाडीमध्ये कार्यरत आहेत.इतक्या मोठ्या संख्येने मनुष्यबळ कार्यरत असतानाही त्यांना मिळणारे मानधन मात्र अल्प आहे.गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हा प्रश्न मांडण्यात येत असुनही गत साडे चार वर्षांपासून मासिक मानधानात वाढ झालेली नाही.त्यामुळे मानधन कधी तरी वाढेल का ? असा सवाल अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि पर्यवेक्षिका संघटनांद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने ऑक्टोबर २०१८ ला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केल्याचे जाहीर केली होती.त्या नंतर केंद्र सरकार राज्य सरकारकडून ही मानधन वाढ जारी करण्यात आलेली नाही.त्यानंतर महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय घेतला.अंगणवाडी सेविका,मदतनीस,मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेत राज्य सरकारकडून लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.आज अंगणवाडी सेविकेस केवळ ०८ हजार ३२५ तर सेविकांना ०५ हजार ९७५ तर मंडतनिसांना केवळ ०४ हजार ४२५ इतके तुटपुंजे मानधन दिले जाते.हे मानधन किमान वेतन कायद्यापेक्षा कमी आहे हे उघड आहे.त्यात कोणाचाही उदरनिर्वाह होऊ शकत नाही.या उलट महाराष्ट्रापेक्षा केरळ,तामिळनाडू,आंध्रप्रदेश,पंजाब,दिल्ली आदी राज्यातील अंगणवाडी सेविकांना जास्त मानधन देण्यात येत आहे.आपले राज्य प्रगत म्हणताना यावर कोणीही विचार करत नसल्याची टीका केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्ता सूत्रे स्विकारताना जाहिर केलेल्या किमान-सामान कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्याचे कबुल केले आहे.मात्र या सरकारचा निम्मा कालावधी उलटत आला असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

वर्तमानात असलेले भ्रमणध्वनी हे कालबाह्य झाले असून त्याने काम करणे अवघड झाले आहे.त्यात पोषण अप्लिकेशन डाउनलोड होत नसल्याची त्यांनी तक्रार केली आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविकांना नवीन भ्रमणध्वनी देण्यात यावे त्याचे ऍप्लिकेशन मराठीतून द्यावे आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.दि.१६ डिसेंबर २०२१ रोजी एकात्मिक बाळ विकास योजनेचे आयुक्त यांनी मंत्र्यासोबत बैठक घेऊन या सेविकांना नवीन भ्रमणध्वनी देण्याचा प्रस्ताव दिला असून त्या साठी रुपये १० हजार रुपये त्वरित मंजूर करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.त्यावेळी त्यांनी विविध घोषणा देऊन तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.

सदर प्रसंगी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले आहे.सम्बधित निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रधान सचिव,आयुक्त महिला बालविकास आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

सदर प्रसंगी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्षा मदिना शेख,सरचिटणीस कॉ.राजेंद्र बावके,सहचिटणीस जीवन सुरुडे यांचेसह रागिणी जाधव,छाया गवंडी,वैशाली मंडलिक,दुर्गा कुलकर्णी,सरला सुपेकर,सुनंदा वाघ,राबिया शेख,मंदा नाईक,संजीवनी आमले,मंदा जोंधळे,सुनीता गोर्डे,अलका दरेकर,नेहा मगर आदींसह बहुसंख्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महिला उपस्थित होत्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close