जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ब्राम्हणगाव ग्रामपंचायत इमारतीचे उदघाटन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग जनसुविधा योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या कार्यालयीन इमारतीचे उदघाटन मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

सदर इमारतीचे उदघाटन सरपंच यांनी आयोजित केले होते.त्यासाठी कोपरगावच आमदार तथा शिर्डी येथील साई संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांना निमंत्रण देण्यात आले होते.मात्र वेळेअभावी त्यांना येता आले नाही त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला आहे”-माधुरी आहेर,सरपंच,ब्राम्हणगाव ग्रामपंचायत.

कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग जनसुविधा योजने अंतर्गत २१ लाख रुपयांची इमारत मंजूर करण्यात आली होती.तिचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे.ती इमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत होती.सदर इमारतीचे उदघाटन सरपंच माधुरी साईनाथ आहेर यांनी आयोजित केले होते.त्यासाठी कोपरगावच आमदार तथा शिर्डी येथील साई संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांना निमंत्रण देण्यात आले होते.मात्र वेळेअभावी त्यांना येता आले नाही त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला असल्याची माहिती सरपंच माधुरी आहेर यांनी दिली आहे.

सदर प्रसंगी उपसरपंच रामदास गणपत पवार,ग्रामपंचायत सदस्य जिजाबाई भुजाडे,मंदाबाई आहेर,जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब आहेर,सोमनाथ आसने,त्रिंबक आहेर,भास्कर सोनवणे, सोमनाथ बनकर,राजेंद्र बनकर,जालिंदर जगधने,बाबासाहेब कुमावत,रतन गंगावणे,राजेंद्र इल्हे,साहेबराव आसने,साहेबराव साबळे,भास्कर आहेर.कारभारी जगधने,रघुनाथ आसने,गणेश आहेर,पोपट सोनवणे,सचिन आसने,विशाल कुमावत,साईनाथ आहेर,राजेंद्र बेलदार,चंदू दोडकर,अरुण आहेर,हरिभाऊ धनवटे,तुकाराम आहेर,बाबासाहेब गायकवाड,त्रिंबक आहेर,शरद आहेर,माधव आहेर,शंकर आहेर,तुषार आहेर,आदी मान्यवरांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close