मनोरंजन
कोपरगावात मराठी रंगभूमी दिन साजरा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मराठी रंगभूमीच्या सेवेत रुजू असणाऱ्या रंगकर्मीच्या व कलासाई नाट्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कोपरगावात नुकताच मराठी रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. १९४३ साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातीलसर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते.त्या मुळे ०५ नोव्हेंबर हा दिवस अतिशय महत्वाचा आहे.दरवर्षी हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया रोवला.त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.
कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या रंगमंचाचे कलासाई नाट्य संस्थेचे नाट्यकर्मींनी,रंगमंच व नटराज पूजनाचा कार्यक्रम ओयोजित केला होता.यावेळी हर्षदा दिवे या स्त्री रंगकर्मीच्या हस्ते नटराज व रंगमंचची पूजा करून नारळ फोडण्यात आले आहे.
दरवर्षी होत असलेल्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ,आयोजित मराठी नाट्य स्पर्धा यावर्षी कोरोना ताळेबंदी मूळे बंद ठेवण्यात आल्या. विविध ठिकाणी नाटक स्पर्धा,नाटकांचे आयोजन होत होते.दरवर्षी कलासाई नाट्य संस्था या सांस्कृतिक संचानालयाच्या नाट्य स्पर्धेत,विविध ठिकाणी आपले नाटक सादर करण्यासाठी सहभागी होत होते.परंतु यावर्षी नाट्य स्पर्धेला खंड पडल्यामुळे उपस्थित नाट्यमंडळींनी खंत व्यक्त केली व लवकरात लवकर या कोरोना महामारीतून सगळ्यां ची सुटका होऊन नाटक परत सुरू व्हावे असे साकडे नटराजाच्या चरणी घालते.
यावेळी उपस्थित कलासाई नाट्य संस्थेचे रंगकर्मी रेखा दिवे,प्रियांका शिंदे,पायल भडकवाडे,गणेश गायकर, वाल्मिक सातपुते,हर्षदा दिवे,सुयोग मावळकर, सागर कालेकर,गोपीनाथ घोरपडे,शैलेश शिंदे आदीनी रंगमंचाचे पूजन केले आहे.