जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
मनोरंजन

अभिनेत्री जयाप्रदांचा भाजपात प्रवेश…

जाहिरात-9423439946

समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जयाप्रदा भाजपात सामील झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया यावेळी जयाप्रदा यांनी दिली आहे.

जयाप्रदा समाजवादी पक्षाकडून रामपूर मतदार संघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. अभिनेत्री जयाप्रदा यावेळी भाजपाकडून आपले नशीब अजमावणार आहे. भाजपाचे दिग्गज नेता नेपाल सिंह यांचे वाढते वय आणि आजारपणामुळे त्यांच्या जागी भाजपाला ठोस उमेदवार हवा होता. आता जयाप्रदा यांच्या आगमानामुळे भाजपाची चिंता मिटल्याची चिन्हे आहेत. समाजवादी पक्षाचे आजम खान यांच्याविरोधात जयाप्रदा लढणार आहेत.

जयाप्रदा २००४ आणि २००९ मध्ये रामपूरमधून खासदार म्हणून संसदेत गेल्या आहेत. दोन्ही वेळेस जयाप्रदा यांनी काँग्रेसच्या बेगम नूर बानो यांचा पराभव केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close