जाहिरात-9423439946
बाजार भाव

कांदा दर पुन्हा एकदा वाढणार,युद्धाचा प्रतिकूल परिणाम-अंदाज

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम आता शेतकऱ्यांच्या हिताचा ठरत असून आगामी काळात कांद्याचे दर वाढणार असून त्याचा फायदा भारतातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील कीटक तज्ञ व शास्रज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी दिली आहे.

“अलीकडे युक्रेन मध्ये कांदा उत्पादनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून रशिया आणि युक्रेन यांचे मिळून जगाच्या पाठीवर एकूण उत्पादनाच्या पाच ते सहा टक्के कांदा उत्पादन घेतले जात आहे.ते क्षेत्र आता कमी होणार आहे.त्यामुळे सप्टेंबर नंतर रशिया व युक्रेन युरोपियन राष्ट्रांना कांदा पुरवठा करतो तिथे भारतीय कांद्यास मागणी वाढू शकते”-डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,कृषी तज्ञ कोपरगाव.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,”सध्या रशिया आणि युक्रेन त्यांच्यामध्ये युद्ध चालू आहे त्यामुळे अनेक कमोडिटीचे भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.युक्रेन आणि रशिया शेतीशी संबंधित प्रगत राष्ट्र आहेत,रशियामध्ये गहू व कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.तर युक्रेनमध्ये गहू,कांदा,लसूण ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात आणि त्याचा पुरवठा युरोप आणि आसपासच्या सोवियत युनियन रशिया चे छोटे छोटे देश यांना पुरवठा केला जातो.रशियामध्ये आणि युक्रेनमध्ये कांदा हे प्रमुख पीक घेतले जाते आणि या पीकाचा एकच हंगाम तिथे असतो.सध्या कांदा लागवडीचा हंगाम चालू झाला असून युद्धामुळे बऱ्याच ठिकाणी वीज खंडित झाली आहे.त्यामुळे याचा परिणाम लागवडीवर होत आहे तसेच युक्रेन आणि रशिया मध्ये अनेक शेतीचे आयात वस्तू युरोप भारत,चीन,अमेरिकेतून पाठवले जातात त्यावर परिणाम झाला आहे.त्यामुळे साधारणपणे दीड ते दोन लाख टन कांदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

अलीकडे युक्रेन मध्ये कांदा उत्पादनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून रशिया आणि युक्रेन यांचे मिळून जगाच्या पाठीवर एकूण उत्पादनाच्या पाच ते सहा टक्के कांदा उत्पादन घेतले जात आहे.ते क्षेत्र आता कमी होणार आहे.त्यामुळे सप्टेंबर नंतर रशिया व युक्रेन युरोपियन राष्ट्रांना कांदा पुरवठा करतो तिथे भारतीय कांद्यास मागणी वाढू शकते.तसेच रशियामध्ये देखील निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकते.यापूर्वी गहू महागणार किंवा त्याचे भाव वाढणार असे संकेत आले होते.आता कांदा देखील भाव खाण्याच्या स्थितीत असल्याची माहिती डॉ.वाघचौरे यांनी शेवटी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close