जाहिरात-9423439946
बाजार भाव

कोपरगावात नाफेडचे हमी भाव हरबरा खरेदी केंद्र मंजूर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे हमी भावाने हरबरा खरेदी केंद्र मंजूर झाले आहे.हरबरा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला हरबरा हमीभावाने विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक नामदेव ठोंबळ यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केले आहे.

नॅशनल ऍग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड) ची स्थापना ०२ ऑक्टोंबर १९५८ रोजी गांधी जयंतीच्या शुभ दिवशी करण्यात आली.नाफेड ही एक बहुराज्य सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहे.शेती उत्पादनांच्या सहकारी मार्केटिंगच्या विकासासाठी ऑब्जेक्टसह नाफेडची स्थापना करण्यात आली आहे.

नॅशनल ऍग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड) ची स्थापना ०२ ऑक्टोंबर १९५८ रोजी गांधी जयंतीच्या शुभ दिवशी करण्यात आली.नाफेड ही एक बहुराज्य सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहे.शेती उत्पादनांच्या सहकारी मार्केटिंगच्या विकासासाठी ऑब्जेक्टसह नाफेडची स्थापना करण्यात आली.नाफेडचे प्रमुख सदस्य कृषी शेतकरी आहेत ज्यांना नाफेडच्या कामकाजातील सामान्य मंडळाच्या सदस्यांमधे काय सांगण्याचे अधिकार आहेत.वर्तमान कालखंडात शेतमाल विकण्यासाठी नाफेडची मदत घ्यावी लागते.

सद्यस्थितीला हरबरा पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे.मागील काही वर्षापासून पर्जन्यमान समाधानकारक होत असल्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन देखील वाढले आहे.यावर्षी देखील हरबरा उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे एकाच वेळी हरबरा विक्रीस आल्यास व्यापाऱ्यांकडून दर घटविले जावून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ना.आशुतोष काळे यांनी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे हमी भावाने हरबरा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याचा दावा केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने ७/१२ उतारा,उताऱ्यावर हरबरा पीक पेरा नोंद आवश्यक असून आधार कार्ड,बँक पासबुक झेरॉक्स प्रत,कॅन्सल /रद्द केलेला चेक आदी कागदपत्रांची हरबरा विक्री नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहे.
नोंदणी क्रमानुसार शेतकऱ्यांना हरबरा कृषी उत्पंन बाजार समितीमध्ये घेवून येण्यासाठी ऑनलाईन लघुसंदेशाच्या माध्यमातून माहिती दिली जाईल व हमी भावाने खरेदी केलेल्या हरबरा पिकाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक नामदेव ठोंबळ व सचिव नानासाहेब रनशुर यांनी दिली असून हरबरा उत्पादक शेतकऱ्यांनीआपला हरबरा बाजार समितीमध्ये विक्री करून आपले नुकसान टाळावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close