जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

चारकोलच्या कलाकृतीचा कोपरगावात गौरव,विद्यार्थ्याचा सन्मान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील प्रसाद कुलकर्णी याने शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची चारकोल खडुचा वापर करुन सर्वात मोठी चित्रकृती साकारली असून त्याची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड व ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

धामोरी येथील प्रसाद कुलकर्णी याने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची चारकोल खडुचा वापर करुन सर्वात मोठी चित्रकृती साकारली आहे.त्याची दखल,” इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड व ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे.व त्याचा गौरव केला आहे.

सदरचे सिवस्तर वृत्त असे की,”अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)चे अर्ध्वर्यु आण्णासाहेब मोरे यांच्या ६८ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्त देश विदेश अभियान विभागाचे प्रमुख नितीन भाऊ मोरे यांच्या हस्ते धामोरी येथे ‘संस्कार कार्यशाळा’ संपन्न झाली आहे.

त्यात धामोरी येथील प्रसाद कुलकर्णी याने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची चारकोल खडुचा वापर करुन सर्वात मोठी चित्रकृती साकारली आहे.त्याची दखल,” इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड व ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे.व त्याचा समर्थांची व गुरुमाऊलींची थ्रीडी इमेज असलेली प्रतिमा व प्रत्येक विभागाची माहिती असलेल्या पुस्तिकांचा संच देऊन गौरव करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचे एडीटर,फाऊंडर,सीईओ प्रसिद्ध दिग्दर्शक व कोरिओ ग्राफर पंकज विंग व प्रिन्स दत्त यांनी प्रमाणपत्र दिले आहे.ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र लवकरच आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल,कोकमठाण येथे ओम गुरुदेव व तेथील २००० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ओएमजी बुकचे एडीटर,फाऊंडर, सीईओ,प्रो.दिनेश गुप्ता यांच्या शुभहस्ते दिले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

प्रसादने कलाक्षेत्रात ऐन पदार्पणातच ही लक्षवेधी कामगिरी केल्यामुळे तो ग्रामीण भागातील कलाकारांना प्रेरणादायी ठरला आहे.त्याच्या यशाबद्दल कोपरगावचे आ.अशुतोष काळे,कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close