जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

कोपरगाव तालुक्यात..या पत्रकाराचा गौरव

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(वार्ताहर)

मानवजातीच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संत-महंताप्रमाणेच पत्रकारितेचे व्रत असून कोपरगाव तालुक्यातील पत्रकार त्याचे पवित्र राखून सेवा करीत आहेत असे उद्गार राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे प्रमुख रमेशगिरी महाराज यांनी संवत्सर येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.

“पत्रकार गायकवाड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रारंभी संवत्सर परिसरामध्ये आपली पत्रकारिता सुरू केली.पत्रकारितेची सर्व नीतिमूल्ये तंतोतंत पाळून व पत्रकारितेशी एकनिष्ठ राहून ते आजही ‘जनशक्ती न्यूजसेवा’पोर्टलचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत”-रमेशगिरी महाराज,श्री क्षेत्र कोपरगाव बेट.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे कोपरगाव बेट येथील आश्रमाचे प्रमुख रमेशगिरी महाराज यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.त्यावेळी पत्रकार शिवाजी गायकवाड यांचा त्यांनी सत्कार केला.याप्रसंगी ते बोलत होते.या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले होते.

सदर प्रसंगी संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,लक्ष्मणराव साबळे,चंद्रकांत लोखंडे, सोमनाथ निरगुडे,ज्ञानदेव कासार,लक्ष्मणराव परजणे,सूर्यभान परजणे,बाळासाहेब दहे,केशवराव भाकरे,बाळासाहेब गायकवाड,नामदेव पावडे,संभाजीराव आगवन,संतोष भोसले,विजय आगवन,रमेश बोरनारे,दत्तात्रय परजणे,बाबुराव मैंद,डॉ.घोरपडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना म्हणाले की,”पत्रकार गायकवाड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रारंभी संवत्सर परिसरामध्ये आपली पत्रकारिता सुरू केली.पत्रकारितेची सर्व नीतिमूल्ये तंतोतंत पाळून व पत्रकारितेशी एकनिष्ठ राहून ते आजही,’जनशक्ती न्यूजसेवा’ पोर्टलचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत.केवळ संवत्सर परिसरातीलच नव्हे तर कोपरगाव तालुक्यातील तळागाळातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी अत्यंत निर्भीडपणे आजवर काम केले आहे.पत्रकारिता करताना कोणताही गट-तट किंवा कोणताही मतभेद किंवा भेदभाव त्यांनी केला नाही.सर्वसमावेशक अशा विचारातून त्यांनी वृत्तपत्रांशी आपली बांधिलकी जपली आहे.राजकीय, सामाजिक क्षेत्रासह आध्यात्मिक क्षेत्रातील विविधांगी उपक्रमाला वर्तमानपत्रातून श्री गायकवाड यांनी वाचा फोडली आहे. व सगळ्या घटकाना न्याय मिळवून दिला आहे.असे सांगून त्यांनी उज्ज्वल परंपरा असलेल्या कोपरगाव तालुक्यातील पत्रकारितेच्या परंपरेचा वारसा यापुढेही असाच सुरू ठेवण्यासाठी श्री गायकवाड आपले योगदान देतील अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close