जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

धनादेश वटला नाही,आरोपीस शिक्षा,कोपरगावातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेली गौतम सहकारी बँकेचे कर्जदार पवन श्रीराम पंजाबी यांनी आपल्या थकीत कर्जपोटी बँकेला आपला धनादेश दिला होता.मात्र बँकेत शिलकेअभावी वटला नव्हता त्याविरुद्ध बँकेने कर्जदाराविरुद्ध दावा ठोकला होता.त्या खटल्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून त्यात आरोपी कर्जदार पवन पंजाबी यास कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्या.एस.एस.बोस यांनी तीन महिने तुरुंगवास व दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.त्यामुळे थकीत कर्जदारांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

चेक बाऊन्स होण्याला एक प्रकारचा गुन्हा मानला जातो.या गुन्ह्यासाठी शिक्षा म्हणून आपल्याकडून काही दंडाची रक्कम वसूल केली जाते.चेक बाऊन्स झाल्यास आपणास आपले पैसे मिळणार नाहीत.तसेच दंड म्हणून आकारली जाणारी रक्कम आपल्या खात्यातूनच वजा केली जाते.जर कोणी आपल्याला चेकद्वारे पैसे दिले आणि आपण तो चेक बँकेत जमा करण्यापूर्वी त्या व्यक्तीशी एकदा खात्यात पुरेसे पैसे आहेत का याची खात्री करून घ्या.जर तो चेक बाउन्स झाला तर आपल्याला त्या व्यक्तीस चेक बाऊन्सबद्दल माहिती द्यावी लागेल.अन्यथा शिक्षा होऊ शकते हे ध्यानात ठेवा.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, कर्जदार पंजाबी यांनी गौतम सहकारी बँकेकडून आपली गरज भागविण्यासाठी सुमारे ५ लाख रुपयांहून अधिकचे कर्ज उचलले होते.ते मुदतीत भरणे गरजेचे होते.त्या बाबत बँकेने वेळोवेळी मागणी केली होती.मात्र कर्जदाराने सदर कर्ज भरण्यास टाळाटाळ केली होती.त्यामुळे बँकेने आपले कर्ज वसुलीसाठी कर्जदार पवन पंजाबी यांचे विरुद्ध कोपरगावात निगोशियेबल इंस्टुमेन्ट ऍक्ट अंतर्गत कलम १३८ दावा गुदरला होता.

सदर कर्जदारास वेळोवेळी वारन्ट बजावून उपयोग झाला नव्हता.व कर्ज भरले नव्हते.त्यापोटी कर्जदाराने आपले धनादेश दिले होते.मात्र ते वटले नव्हते.त्याविरुद्ध बँकेने न्यायालयात दावा करून न्यायालयात अड्.ऋषिकेश जपे यांनीं जोरदार युक्तिवाद केला होता.प्रारंभी या खटल्यात अड्.आर.एस.जपे यांनी काम पाहिले होते.

सदर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण आरोपीस तीन महिने तुरुंगवास व दंडात्मक करवाई केली आहे.दंडात्मक रक्कम न भरल्यास सहा महिने आणखी तुरुंगवासाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान या निकालाने थकबाकीदार कर्जदारांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्याचा बँकेच्या वासुलीवर सकारात्मक परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close