जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एकाचे अकाली निधन,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या ईशान्येस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या अंबिकानगर येथील रहिवासी असलेले इसम राजेंद्र जगन्नाथ सोळसे (वय-५७) यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यानिधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मयत राजेंद्र सोळसे याना दि.३० ऑगष्ट रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांनी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले आहे.उत्तरीय तपासणी नंतर तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

याबाबत डॉ.उंबरकर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे यांनी भेट दिली आहे.तिच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.५३/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.तिकोणे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close