जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

‘पोहेगाव नागरी पतसंस्था बदनामी’ प्रकरण,पत्रकार जवरेंसह चारही आरोपी निर्दोष मुक्त

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील पोहेगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी (नागरी) पतसंस्थेने सन-२०१० साली दैनिक गांवकरी या प्रसिद्ध वृत्तपत्रात संस्थेविरुद्ध बातमी देऊन बदनामी केली असे म्हणून कोपरगाव येथील कोपरगाव वरिष्ठ स्तर न्यायालय क्रं.०३ मध्ये संस्थेच्या बदनामीचा दावा ठोकला होता. व त्यात येथील आरोपी म्हणून कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सचिन रोहमारे,गावकरीचे तत्कालीन उपसंपादक नानासाहेब जवरे,संपादक वंदनराव पोतनीस,समूह संपादक अरविंद पोतनीस यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून यात कोपरगाव वरिष्ठ स्तर क्रं.०३ चे न्यायमूर्ती ए. सी.डोईफोडे यांनी निर्दोष मुक्त केले आहे.

सदर खटल्यात संस्था चालक व फिर्यादी हे संस्थेची बदनामी झाली हे सिद्ध करून शकले नाही.शिवाय जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनीं दिलेली कारणे दाखवा नोटिस न्यायालयापुढे जाणीवपूर्वक हजर करू शकले नाहीत.त्यामुळे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीना सोडून दिले आहे.या संस्थेने भलत्याच जागेत इमारत बांधून सरकारचा महसूल बुडवला असल्याची बाब अड्.जयंत जोशी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.या सर्व बाबी गृहीत धरून न्यायालयाने सर्व आरोपीना सोडून दिले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी संस्थेने कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालय क्रं.०३ मध्ये दावा केला होता.व त्यात त्या संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठल घारे यांनी म्हटले होते की,”दैनिक गावकरीच्या दि.२७ ऑक्टोबर २०१० च्या वृत्तपत्रात पान ११ वर बातमी प्रसिद्ध करून त्यात,”कारभार पोहेगाव ग्रामपंचायतीचा” या शीर्षकाखाली,”पतसंस्थेची पंचवीस लाखांची इमारत भलत्याच जागेत” अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती.त्यात पोहेगाव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेने सेवा शर्तीचा भंग करून बेकायदेशीर रित्या मंजूर क्षेत्र सोडून २५ लाख रुपयांची इमारत भलत्याच जागेत बांधली अशा आशयाची बातमी तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य सचिन रोहमारे यांनीं माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीच्या आधारे ‘ती’ छापली होती.त्यात संस्थेने जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी करून,ग.क्रं.५१२(१) मध्ये “००.०३ आर क्षेत्र” जागा मिळवली होती.त्यानुसार भूमी अभिलेख विभागाकडून सदरची जागा निश्चिती करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सेवा शर्तींचे पालन करून त्यावर बांधकाम करणे अभिप्रेत असताना संस्थेने सदर जागा सोडून भलत्याच जागेत म्हणजे ग.क्रं.७८(२) सिटी सर्व्हे क्रं.६१० मध्ये बांधली होती.हि बाब तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य सचिन रोहमारे यांच्या लक्षात आली असता त्यांनी या बाबत माहिती अधिकारात माहिती मागून त्या बाबत आमचे प्रतिनिधी नानासाहेब जवरे यांना पुराव्यासह माहिती दिली होती.

हीच ती दै.गावकरीच्या अंकात दि.२७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेली बातमी हिच्यावरूनच बदनामीचा दावा प्रस्तापित संस्थेच्या अध्यक्ष व्यवस्थापक यांनी गुदरला होता.व बदनामीचा कांगावा केला होता.वास्तविक जिल्हाधिकारी,व प्रांताधिकारी यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटीसीवरून सदर बातमी प्रसिद्ध केली होती.

त्या बाबत आमच्या प्रतिनिधीने सदरची बातमी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात दि.२७ ऑक्टोबर २०१० रोजी छापली होती.त्याचा आकस मनात धरून सदर संस्था चालक नितीन औताडे यांनी संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठल रामभाऊ घारे यांचे करवी कोपरगाव येथील अड्.शंतनू धोर्डे यांचे मार्फत दि.२९ ऑक्टोबर २०१० रोजी प्रथम नोटीस पाठवली होती.व संस्थेची बदनामी झाली म्हणून ०५ लाख रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.त्या नंतर कोपरगाव वरिष्ठ स्तर न्यायालय क्रं.०३ येथील न्यायालयात संस्थाचालक नितीन औताडे यांनी त्यांचे व्यवस्थापक विठ्ठल घारे यांचे मार्फत एस.एस.सी.२१५/२०११ हा खटला गुदरला होता.
त्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली असून त्याचा युक्तिवाद दोन्हीबाजूनी पूर्ण झाला असून त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला झाला आहे.त्यात आरोपी म्हणून सचिन रोहमारे,कोपरगाव येथील गावकरीचे उपसंपादक नानासाहेब जवरे,संपादक वंदनराव पोतनीस,समूह संपादक अरविंद पोतनीस आदींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.आरोपींच्या वतीने प्रसिद्ध वकील व वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी यांनी काम पाहिले त्यांना अड.वैभव बागुल,योगेश दाभाडे,व्ही.पी.ख्रिस्ते यांनी सहाय्य केले तर फिर्यादी संस्थेच्या वतीने अड्.शिवाजी खामकर यांनी काम पाहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close