जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अतिक्रमण मोहिमेत अडथळा,कोपरगावात एकावर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अतिक्रमण मोहीम गत चार दिवसापासून सुरु असून त्या मोहिमेस निंभारा मैदान येथील आरोपी अलीम छोटू शहा याने जिओ मोबाईल दुकानांच्या समोर अडथळा आणल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांत कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी सुनील आरण यांनी गुन्हा दाखल केल्याने शहरात अतिक्रमण धारकांत खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरातील गांधी चौकात अतिक्रमण काढणाऱ्या पथकाला तेथील आरोपी अलीम शहा याने,”माझे अतिक्रमण काढू नका”,”तुम्ही जर अतिक्रमण काढले तर तुमचे कडे पाहून घेतो” असे म्हणून संबंधित अधिकारी यांना दमबाजी केली तर काहींना धक्काबुक्की व अरेरावी केल्याचे वृत्त आहे.त्यामुळे तेथील उपस्थित अधिकाऱ्यांनी आरोपी शहा याला पोलिसी हिसका दखवत त्याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वर्तमानात कोपरगाव नगरपरिषद हद्दीत,”अतिक्रमणाचा कॅन्सर” मोठ्या प्रमाणात वाढला होता.त्यामुळे ज्यांनी लाखो रुपये घालून स्वतःच्या जागेत अधिकृतरित्या आपले व्यापारी संकुल बांधले त्यांच्यावर अन्याय होत होता.याबाबत वारंवार तक्रारी करूनही पालिकेकडून न्याय मिळणे दुरापास्त होत हॊते.या बाबत नगर परिषद सभागृहात वारंवार चर्चेचे गुऱ्हाळ होऊनही त्यात काहीही प्रगती होत नव्हती.तसा प्रयत्न व कार्यवाही करणारे प्रामाणिक अधिकारी सुनील गोर्डे यांच्यावर हल्ला झाला होता.त्यातून कोपरगाव नगरपरिषदेच्या दोन सत्ताधारी गटाच्या नगरसेविका विरुद्ध अपात्रतेची कारवाई बाबत जिल्हाधिकारी यांचे समोर सुनावणी दि.२२ मार्च रोजी सुरु असताना सदर जागेवर अद्याप अतिक्रमण झाले असल्याची बाबत जिल्हाधिकारी यांचे समोर आली होती.व सदर जागेवर अधिकचे अतिक्रमण वाढले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले होते.त्यामुळे प्रमुख जिल्हास्ततरीय अधिकारी यांचा पारा अधिकच चढला होता.त्यातून नगरपरिषदेचे जबाबदार अधिकारी व शिर्डी येथील महसुली अधिकारी यांचे कान उपटले असल्याचे वृत्त आहे.व त्यातूनच त्वरित अतिक्रमण काढण्याचे त्यांनी फर्मान काढल्याचे वृत्त आहे.त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेने अचानक आपले जे.सी.बी.कारवाईसाठी सज्ज केले होते.त्यातून काल तहसील कार्यालयात आगामी सहा एप्रिल रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर उपमुख्यमंत्री येत असल्याच्या पार्श्वभुमीवर बैठक आयोजित केली होती.सदर बैठक संपताच या कारवाईस सुरुवात करण्यात आली होती.

सदर अतिक्रमण मोहिमेस काही असामाजिक तत्त्वांनी विरोध करून पाहिला काहींची डाळ शिजली नाही.मात्र काहींनी या यंत्रणेला विरोध करून पाहिला असता त्यावे विरोधात नगरपरिषद प्रशासनाने हिसका दाखवला आहे.

अशीच घटना नुकतीच गांधी चौकात घडली असून तेथिल अतिक्रमण काढणाऱ्या पथकाला तेथील आरोपी अलीम शहा याने,”माझे अतिक्रमण काढू नका”,”तुम्ही जर अतिक्रमण काढले तर तुमचे कडे पाहून घेतो” असे म्हणून संबंधित अधिकारी यांना दमबाजी केली तर काहींना धक्काबुक्की व अरेरावी केल्याचे वृत्त आहे.त्यामुळे तेथील उपस्थित अधिकाऱ्यांनी आरोपी शहा याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी संजय सानप,पोलीस निरीक्षक आदींनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.७०/२०२२ भा.द.वि.कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close