जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

चुलत भावानेच भावाचा काटा काढला,कोपरगावात आरोपीस पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील पूर्वेस असलेल्या कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिवारात रात्रीच्या सुमारास झारखंड हाजीराबाद जोघी सिमरा येथील तरुण सोहन युगुल भासके (वय-२२) याच्या खुनाच्या आरोपी रबीन भासके यास कोपरगाव वरिष्ठ स्तर न्यायाधीश ए.सी.डोईफोडे यांच्या समोर हजर केले असता त्यास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यास दि.०८ फेब्रुवारी पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान मयत हा आरोपीचा चूलत भाऊ असल्याचे निष्पन्न झाले असल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.

दरम्यान आरोपी रबीन भासके यास अटक करून आज कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश ए.सी.डोईफोडे यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन आरोपीस दि.०८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी सात दिवस पोलीस कोठडी मागितली होती.आरोपी हा मयताचा चुलत भाऊ असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी शिवलिंग गायकवाड हा पोहेगाव येथील रहिवासी असून कोकमठाण हद्दीत महावितरणच्या पारेषण विभागाचे टॉवर उभारणीचे काम सुरु होते त्या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून कामावर आहे.सदरचे काम वेगाने सुरु असून त्या ठिकाणी मयत तरुण सोहन भासके हा काम करण्यासाठी झारखंड येथून आपल्या साथीदारांसह आला होता.तो दि.०२ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आपले काम आटोपून घरी जात असताना काही तरी अज्ञात कारणाने त्यास डोक्यावर जोरदार प्रहार झाला असून त्यात तो मृत्युमुखी पडला असल्याची फिर्याद पोहेगाव येथील पर्यवेक्षक शिवलिंग पुंजाजी गायकवाड (वय-४१) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१२ सी.आर.पी.सी.१७४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
या घटनेत मयताच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाला होता.त्यामुळे हा काहीतरी घात पात असण्याची शक्यता आमच्या प्रतिनिधीने वर्तविण्यात आली होती.दरम्यान या घटनेची पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी गंभीर दखल घेऊन तपासाची चक्रे फिरवली होती.
‘ती’ खरी ठरली असून आरोपी हा त्याच काम करणाऱ्या टोळीतील असून मयत व आरोपी तरुण रबीन भासके यांच्यात भ्रमणध्वनी देण्याघेण्याच्या नाजूक कारणावरून वाद निर्माण झाला होता.त्यातून आरोपीने कामावरील पारेशन विभागाच्या टॉवरची लोखंडी पट्टी व हातोडा यांच्या सहाय्याने मयतावर वार केला होता.वार एवढा मोठा होता की त्याने ‘तो’ जागीच गतप्राण झाला होता.घटना स्थळी आपल्या हातून विपरीत घडल्याची जाणीव झाल्यावर आरोपीने घटनास्थळावरून तत्काळ पलायन केले होते.
तथापि ही खबर कोपरगाव शहर पोलिसांना लागल्यावर ते तातडीने घटनास्थळी हजर होऊन त्यांनी स्थळ पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद करून आरोपीच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली होती व त्याला काही तासात जेरबंद केले होते.त्याची कसून चौकशी करुन पोलिसी हिसका दाखवल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला व जबाबात त्याने ‘त्या’ खुनाची कबुली दिली आहे.घटनास्थळी मयत तरुण हा कानात कर्णफोन तसेच होते.यावरून हा वाद झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मयत आरोपीचा चुलतभाऊ असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.

दरम्यान आरोपीस अटक करून आज कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश ए. सी.डोईफोडे यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन आरोपीस दि.०८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी सात दिवस पोलीस कोठडी मागितली होती.सदर प्रसंगी आरोपीच्या वतीने अड्.अनुप ठोळे यांनी बाजू मंडळी तर सरकारी पक्षाच्या वतीने अड्.श्रीमती शेख मॅडम यांनी बाजू मांडली आहे.
तथापि हा खून त्याने भ्रमणध्वनीसाठीच केला की अन्य काही कारणासाठी हे अद्याप पुरेसे स्पष्ट झालेले नाही पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close