सामाजिक उपक्रम
‘शिव-विवाह’ संबोधून छ्त्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करू नका-..या नेत्याचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुरोगामी महाराष्ट्रात या पूर्वी जसे आंतरजातीय विवाह संपन्न झाले तसाच पुणे जिल्ह्यात नुकताच मुस्लिम मुलगा व हिंदू मुलगी यांचा विवाह संपन्न झाला आहे.मात्र पुढे या जोडप्याच्या आयुष्यात काय वाढून ठेवले जाते.हे संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले आहे.हीच बाब मुस्लिम मुलगी असती तर हा विवाह संपन्न झाला असता का ? असा कडवा सवाल कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला आहे.
दरम्यान कोपरगाव शहर आणि तालुक्यात अनेक प्रकरणे ‘लव जिहाद’ची होत असल्याचा दावा काही हिंदू संघटनांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला असून यातून मुलींच्या पालकांची काळजी वाढली आहे.या प्रकरणी काही हिंदू संघटनांनी जागृती मोहीम सुरु केली आहे.अनेक मुस्लिम तरुण यात सहभागी होत असून यात अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक ठिकाणाहून त्यास मोठी आर्थिक रसद पुरवली जात असल्याची माहिती हाती आली आहे.यात या मुलींना बरबाद करून सोडून दिले जात आहे.व हिंदू अल्पसंख्याक समाजाची मालमत्ता तुमच्याच नावावर होणार असल्याचे आमिष मुस्लिम समाजातील तरुणांना दाखवून त्यांचे ‘ब्रेन वोश’ केले जात असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.मात्र बदनामीच्या भीतीने मुलींचे पालक समोर येण्यास तयार होत नाही.
पुणे येथे स्वाती शेळके या हिंदु मुलीचा अरिफ काझी या मुसलमान मुलाशी ‘शिवविवाह’ म्हणून विवाह लावून देण्यात आला.संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवधर्म स्थापन केला आहे आणि ‘शिवविवाह’ ही पद्धत निर्माण केली आहे.’शिवविवाह’ हा हिंदु धर्मातील पारंपरिक विवाहाला फाटा देऊन भारतीय राज्यघटनेला साक्षी ठेवून केला जातो.पुणे येथे झालेल्या या विवाहाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होत्या.त्यावरून कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हा नेमका टोला लगावला आहे.
त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”आंतरजातीय विवाहाचे नामकरण ‘शिवविवाह’ करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे.महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वेळी उपस्थित होत्या.त्यांनी या विवाहाला ‘शिव विवाह’ नाव देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना केली आहे.या घटनेत जर मुलगी हि ‘मुसलमान’ व मुलगा हा ‘हिंदू’असता तर पुरोगामी म्हणवणाऱ्यानीं ‘या’ विवाहाला उपस्थित राहण्याचे धाडस दाखवले असते का ? असा सवाल विचारून त्यांनी विवाहाला उपस्थित राहाणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचेवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे.व त्या असे ‘महान कार्य’ करणार आहे का ? असा कडवा सवाल विचारला आहे.व त्यांनी करावे असे करावे असे आवाहन केले आहे.व यात राज्याचे व शिवसेनेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात सहभाग नोंदवून असे विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान टाळण्यासाठी होणार नाही अशी काळजी घ्यावी अशी शिवप्रेमींनी अपेक्षा असल्याचें माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.