न्यायिक वृत्त
नितीन औताडे अटक बातमी,संपादक नानासाहेब जवरे यांची निर्दोष मुक्तता
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील आरोपी व पोहेगाव पतसंस्थेचा संस्थापक,माजी सरपंच नितीन औताडे व त्याच गावातील फिर्यादी स्व.नानासाहेब माधवराव औताडे यांच्यात हाणामारी होऊन त्याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२१ रोजी गु.र.क्रं.६६/२०२१ हा गुन्हा दाखल झाला होता.त्याची बातमी आमच्या प्रतिनिधीने ‘जनशक्ती न्यूजसेवा’ या संकेत स्थळावर प्रसिद्ध केल्याचा राग येऊन त्या बाबत आमच्या प्रतिनिधीवर नितीन औताडे यांनी कोपरगाव येथील,’प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी’ यांचे कोर्टात दावा दाखल केला होता.मात्र त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून यात आरोपी संपादक तथा पत्रकार नानासाहेब जवरे यांना कोपरगाव वरिष्ठ स्तर न्या.ए.सी.डोईफोडे यांनी निर्दोष मुक्त केले आहे.त्याबद्दल नानासाहेब जवरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
“बातमी देणे म्हणजे कोणाची बदनामी होते असा अर्थ लावता येत नाही.या फिर्यादीत नितीन औताडे यांना अटक कुठे व कधी केली याचा तपशील जोडला नसल्याचा मुद्दा लक्षात आणून दिला.तसेच भारतीय राज्य घटनेने,’कलम १९’ प्रमाणे बोलण्याचा व लिहिण्याचा पत्रकारास अधिकार दिलेला आहे.तसेच राज्य घटनेप्रमाणे माध्यमे व पत्रकार हा लोकशाहीचा ‘चौथा आधार स्तंभ’ आहे.ते समाजाचे डोळे आणि कान आहे.त्यांना कायद्याने देखील संरक्षण दिले आहे.त्यात पत्रकार नानासाहेब जवरे यांनी कुठलीही बदनामी केलेली नाही.त्यामुळे त्यांनी कुठेही भूमिका केलेली दिसून आलेली नाही.त्यामुळे आरोपी संपादक जवरे यांच्यावर भा.द.वी.कलम ४९९,५००,३४ प्रमाणे कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही.त्यामुळे फिर्यादी नितीन औताडे यांचा दावा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २०३ अन्वये (डिसमिस) काढून टाकण्यात आला आहे”न्या.ए.सी.डोईफोडे,न्यायमूर्ती,कोपरगाव वरिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी नानासाहेब औताडे व नितीन औताडे यांच्यात काही कारणावरून गावात वाद होता.त्याचे पर्यावसान मयत फिर्यादी यास व त्याच्या नातेवाईकांना गंभीर मारहाण करण्यात आली होती.त्यातून शिर्डी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा र.क्रं.६६/२०२१ दाखल केला होता.या गुन्ह्यातून सुटका होण्यासाठी स्वतः पोलीस ठाण्यात चुकून हजर झाला होता.हि बाब वकिलामार्फत ज्ञात झाल्यावर तेथून आरोपी नितीन औताडे याने पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.त्यात पोलिसांत आणि त्यांच्यात पळून जाताना झटापट झाली होती.व पोलिसांनी त्यास अटक केली होती.नंतर शिर्डीतील काही मध्यस्थ घालून सदर गुन्हा मागे घेण्यासाठी त्याच रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केला असल्याचा वृतांत काही गोपनीय माहितीच्या आधारे दिला होंता.याचे वृत्त संपादक असलेले नानासाहेब जवरे यांनी आपल्या ‘जनशक्ती न्यूजसेवा’ या संकेतस्थळावर (न्यूज पोर्टलवर) ‘तो’ प्रसिद्ध केला होता.त्याचा राग आरोपी नितीन औताडे यास आला होता.व त्याने “जनशक्ती न्यूजसेवा” संकेतस्थळविरुद्ध कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी न्या.ए.सी.डोईफोडे यांच्यासमोर क्रिमिनल दावा (क्रं.२२५/२०२१) भा.द.वि.कलम ४९९,५००,३४ प्रमाणे दाखल केला होता.
त्यात फिर्यादी नितीन औताडे हे पोहेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच,पोहेगाव नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष,व एका राजकीय पक्षाचे प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचा दावा केला होता.व आरोपी मयत नानासाहेब औताडे हे आरोपी व अवैध दारूचा व्यवसाय करत असल्याचा आरोप केलेला होता.व फिर्यादी नितीन औताडे यांची मुद्दाम बदनामी केली असल्याचा दावा केला होता.व आरोपी संपादक जवरे यांना समन्स बजावले होते.त्या साठी बाजू मांडण्यासाठी अड्.योगेश खालकर यांनी वकील पत्र सादर केले होते.दरम्यान याघटनेतील फिर्यादी नानासाहेब औताडे याचे कोरोनामुळे दि.०६ मे २०२१ रोजी निधन झाले होते.तरीही हा दावा सुरु होता.
त्या बाबत कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.डोईफोडे यांचे समोर नुकतीच सुनावणी पूर्ण झाली असून यात आरोपी संपादक नानासाहेब जवरे यांची बाजू अड्.योगेश खालकर यांनी समर्थपणे पणे मांडली आहे.
तर आरोपी नितीन औताडे याची बाजू अड्.शिवाजी खामकर यांनी मांडली असून त्या नंतर न्या. डोईफोडे यांनी हा संपादक नानासाहेब जवरे यांना निर्दोष मुक्त केले आहे.
या निकालपत्रात न्या.डोईफोडे यांनी,”बातमी देणे म्हणजे कोणाची बदनामी होते असा अर्थ लावता येत नाही.या फिर्यादीत नितीन औताडे यांना अटक कुठे व कधी केली याचा तपशील जोडला नसल्याचा मुद्दा लक्षात आणून दिला होता.तसेच भारतीय राज्य घटनेने,’कलम १९’ प्रमाणे बोलण्याचा व लिहिण्याचा पत्रकारास अधिकार दिलेला आहे.तसेच राज्य घटनेप्रमाणे माध्यमे व पत्रकार हा लोकशाहीचा ‘चौथा आधार स्तंभ’ आहे.ते समाजाचे डोळे आणि कान आहे.त्यांना कायद्याने देखील संरक्षण दिले आहे.त्यात पत्रकार जवरे यांनी कुठलीही बदनामी केलेली नाही.त्यामुळे त्यांनी कुठेही भूमिका केलेली दिसून आलेली नाही.त्यामुळे आरोपी संपादक जवरे यांच्यावर भा.द.वी.कलम ४९९,५००,३४ प्रमाणे कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही.त्यामुळे फिर्यादी नितीन औताडे यांचा दावा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २०३ अन्वये (डिसमिस) काढून टाकण्यात आला असल्याचे न्यायालयाने शेवटी म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी नगर जिल्हा पत्रकार संघाने संपादक नानासाहेब जवरे यांच्या निर्दोष सुटेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या प्रकरणी अड्.योगेश खालकर यांनी संपादक नानासाहेब जवरे यांना मोफत विधी सहाय्य पुरवले आहे.त्याबद्दल निळवंडे कालवा समितीने अड्.खालकर व संपादक नानासाहेब जवरे यांचे अभिनंदन केले आहे.