जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव नजीक दुचाकीस्वाराची लूट,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या नजीक असलेल्या येवल्या नाक्याजवळ दि.२९ जानेवारी रोजी दिवसा दुपारी ०२ वाजेच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी येवला येथील गॅस गोदामा समोर आयुर्वेदिक औषध व्यापारी इंदूलसा रामलु पेंरला (वय-४८) हे आपल्या हिरो होंडा दुचाकीवरून (क्रं.एम.एच.०१ ई.८१९२) वरून जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना लोखंडी पाईपने व हाताने मारहाण करून त्यांच्याकडील वरील गाडी व रोख रक्कम खिशातून काढून एकूण २५ हजार ४०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव व येवला तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या लुटीतील एका आरोपीने पांढऱ्या रंगांची विजार,सदरा,घातलेला होता.व दोन्ही कानात बाळ्या व पांढऱ्या रंगाची मुखपट्टी घातलेली होत्या.तर दुसऱ्याने अंगात राखाडी रंगाचे जर्किंग,व पांढऱ्या रंगाचा सदरा,काळ्या रंगाची विजार घातलेली होती.डोक्याचे केस वाढलेले व दाढीचा फ्रेंच कट वाढवलेला होता.अशी माहिती आपल्या कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या फिर्यादीत दिली आहे.

वर्तमानात कोपरगाव शहर व परिसरात चोरट्यांनी डोके वर काढले असून वरचेवर चोरट्यांनीं आपल्या लीला दाखवून पोलिसांना नाक खाजवून दाखविण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून अशीच घटना कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण दीड कि.मी.अंतरावर घडली आहे.येवला येथील आयुर्वेदीक व्यापारी इंदुलसा पेंरला हे आपल्या वरील क्रमांकाच्या हिरो होंडा या दुचाकीवरून जात असताना त्यांना येवला नाका नजीक असलेल्या गॅस गोदामानजीक दोन अज्ञात चोरट्यांनी अडवले.व त्यांना लोखंडी पाईपने व हाताने मारहाण करून धमकावून त्यांच्याकडील २५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी व १००,व ५० दाराच्या ४०० रुपयांच्या नोटा अशी एकूण २५ हजार ४०० रुपयाचा ऐवज पळवून नेला आहे.

दरम्यान उशिरा मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव बशहर पोलिसांनी वरील वर्णनावरून आरोपी नावे राहुल चव्हाण रा.करंजी,तुकाराम भरम भोसले रा. पढेगाव यास रात्री अकरा वाजता अटक केली असून दुसऱ्या आरोपीस आज पहाटे च्या सुमारास अटक केली आहे.कोपरगाव शहरात पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

यात एका आरोपीने पांढऱ्या रंगांची विजार,सदरा,घातलेला होता.व दोन्ही कानात बाळ्या व पांढऱ्या रंगाची मुखपट्टी घातलेली होत्या.तर दुसऱ्याने अंगात राखाडी रंगाचे जर्किंग,व पांढऱ्या रंगाचा सदरा,काळ्या रंगाची विजार घातलेली होती.डोक्याचे केस वाढलेले व दाढीचा फ्रेंच कट वाढवलेला होता.अशी माहिती आपल्या कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या फिर्यादीत दिली आहे.घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक देसले,पोलीस उप-निरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट दिली आहे व घटनेचे गांभीर्य समजावुन घेतले आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.क्रं.२१/२०२२ भा.द.वि.कलम ३९४,३४१,३२३,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close